मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2022 Auction आधी रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, Mumbai Indians मध्ये कोण कायम राहणार?

IPL 2022 Auction आधी रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया, Mumbai Indians मध्ये कोण कायम राहणार?

पुढच्या आयपीएलआधी (IPL 2022) दोन नव्या टीम दाखल होणार आहेत, तसंच खेळाडूंचाही लिलाव (IPL 2022 Auction) होणार आहे, त्यामुळे प्रत्येक टीमला खेळाडूंमध्ये बदल करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 18 ऑक्टोबर : आयपीएल 2021 चा (IPL 2021) मोसम मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) निराशाजनक राहिला. पाच वेळा चॅम्पियन झालेल्या मुंबईला यंदा प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. आता पुढच्या आयपीएलआधी (IPL 2022) दोन नव्या टीम दाखल होणार आहेत, तसंच खेळाडूंचाही लिलाव (IPL 2022 Auction) होणार आहे, त्यामुळे प्रत्येक टीमला खेळाडूंमध्ये बदल करावा लागणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सला आपली कोर टीम कायम ठेवायची आहे, पण लिलावामुळे सगळं समीकरण बदललं आहे.

एखादा चमत्कार झाला तरच मुंबई इंडियन्सला पुन्हा तीच टीम मिळेल, असं रोहित शर्मा म्हणाला आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या खेळाडूंसह मागच्या काही वर्षांमध्ये मोठं यश मिळवलं. याच खेळाडूंनी मुंबईला पाचवेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं. मुंबई इंडियन्स जगातल्या सगळ्यात यशस्वी टीमपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रोहित शर्माचा एक व्हिडिओ शेयर केला आहे, यात त्याने आयपीएल लिलावावर भाष्य केलं आहे.

'जोपर्यंत चमत्कार होत नाही, तोपर्यंत आमच्याकडे पहिल्यासारखी टीम नसेल. पुढच्या वर्षी याच खेळाडूंना टीममध्ये ठेवणं कठीण असेल. पण आम्ही आमचे प्रमुख खेळाडू पुन्हा मिळवू, अशी अपेक्षा आहे,' असं रोहित म्हणाला.

'मुंबई इंडियन्सने शोधून काढलेल्या खेळाडूंचं श्रेय स्काऊटना जातं. या स्काऊटमुळे आम्ही लिलावात काही सर्वोत्तम खेळाडूंना निवडलं. स्काऊट स्थानिक खेळांवर लक्ष ठेवतात आणि आम्हाला प्रतिक्रिया देतात. इथल्या वातावरणामुळेही खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करू शकतात. हे खेळाडू एक-दोन मॅचमुळे किंवा एक-दोन सिझनमुळे तयार झाले नाहीत, तर इथल्या वातावरणामुळे तयार झाले,' असं रोहितने सांगितलं.

First published:

Tags: Ipl, Ipl 2022 auction, Mumbai Indians, Rohit sharma