नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर: प्लेऑफमध्ये(play off ipl 2021) दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू हे संघ गेले असून तिसऱ्या स्थानासाठी हैद्राबाद सोडता इतर संघामध्ये चुरस आहे. यामध्ये शर्यतीत मुंबई इंडियन्सचा (mumbai indians)संघही आहे. दरम्यान संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र सध्या सामन्यापूर्वी फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
रोहित आपल्या इंस्टाग्राम अकाउटवर एक प्रँक (Prank)करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित एक चॉक्लेट त्याच्या मुठीत बंद करुन अचानक पत्नी रितीकासमोर येतो. तो तिला मुठीत काय आहे? ते पाहायला सांगतो. पण रोहितच्या खोडकर वृत्तीमुळे दचकलेली रितीका सुरुवातीला भितीपोटी मुठीला हात लावत नाही. अखेर रोहितच्या म्हणण्यावर ती मुठीला स्पर्श करताच रोहित मुठी खोलतो त्यावेळी त्यात चॉक्लेट पाहून रितीकाही आनंदी होते.
हे वाचा- IPL 2021, MI vs RR : ...तरच रोहितच्या संघाला मिळेल Play Off मध्ये स्थान
रोहितचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन रोहितला प्रँकस्टार अशी पदवी देणारी कमेंट कमेंट बॉक्समध्ये दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
या कमेंट्समध्ये काही नेटकऱ्यांनी रोहितला संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्याची आठवण करुन दिली आहे. यंदाच्या आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता आता त्यांच्या दमदार कामगिरीवर अवलंबून असेल. कारण रोहित शर्माच्या या टीमला आता फक्त जिंकणेच नाही तर त्यांचा नेट रन रेटही वाढवायचा आहे.
हे वाचा- 'त्या' ट्विटवरुन दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाला CSK फॅन्सने सुनावले खडेबोल
संघाला पुढील दोन सामने राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्याशी खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने सोपे होणार नाहीत कारण सनरायझर्सकडे गमावण्यासारखे काहीच नाही आणि राजस्थान रॉयल्स स्वतः प्लेऑफच्या शर्यतीसाठी मोठा दावेदार आहे.
रितिका-रोहित 2015 साली लग्नाच्या बेडीत अडकले. रोहतची पहिली गर्लफ्रेंड सोफिया हयातबरोबरच्या ब्रेकअप नंतर रोहितची रितिका बरोबर ओळख झाली. पुढे खूप चांगली मैत्री होऊन त्या मैत्रीचं रुपांर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी 2015 साली लग्न केलं. ज्यानंतर त्यांनी एका मुलीला जन्म दिला. समायरा ही रोहित-रितिकाची क्युट मुलगी आहे. अनेक मॅचेसला रितिका समायराला घेऊन मैदानावर उपस्थिती लावत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma