Home /News /sport /

IND vs WI : रोहित वेस्ट इंडिज सीरिज खेळणार का? फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला

IND vs WI : रोहित वेस्ट इंडिज सीरिज खेळणार का? फिटनेस टेस्टचा रिपोर्ट आला

रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) गेला नव्हता. दुखापतीमुळे रोहित एनसीएमध्ये (NCA) फिट होण्यासाठी गेला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजआधी (India vs West Indies) रोहित शर्माची फिटनेस टेस्ट घेण्यात आली.

पुढे वाचा ...
    बंगळुरू, 26 जानेवारी : रोहित शर्मा (Rohit Sharma) हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) गेला नव्हता. दुखापतीमुळे रोहित एनसीएमध्ये (NCA) फिट होण्यासाठी गेला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजआधी (India vs West Indies) रोहित शर्माची फिटनेस टेस्ट घेण्यात आली. या फिटनेस टेस्टमध्ये रोहित शर्मा पास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रोहितने फिटनेस टेस्ट पास केल्यामुळे आता वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे आणि टी-20 सीरिज खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये रोहित पहिल्यांदाच वनडे टीमचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये रोहित पहिल्यांदाच टीमचा पूर्णवेळ टी-20 कर्णधार झाला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजमध्येच रोहितला ही संधी मिळाली असती, पण दौऱ्याच्या काही दिवस आधीच रोहितला दुखापत झाली. रोहितच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुलने (KL Rahul) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं, पण यात त्याला अपयश आलं. या वनडे सीरिजमध्ये भारताचा 3-0 ने पराभव झाला. रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजसाठी फिट झाला असला तरी रवींद्र जडेजाच्या फिटनेसबाबतचा संशय कायम आहे. जडेजाच्या टीम इंडियातल्या पुनरागमनाला वेळ लागू शकतो. दुखापतीमुळे जडेजाही दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला नव्हता. फिटनेस टेस्ट पास झाल्यानंतर रोहित शर्मा आज संध्याकाळी एनसीएमध्येच निवड समितीला भेटणार आहे. या बैठकीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 टीम निवडीबाबत चर्चा होणार आहे. 6 फेब्रुवारीला 3 वनडे मॅचच्या सीरिजपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरूवात होईल. यानंतर 3 टी-20 मॅचची सीरिज खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे वनडे सीरिज अहमदाबादमध्ये तर टी-20 सीरिज कोलकात्यामध्ये होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, West indies

    पुढील बातम्या