IPL 2019 : वर्ल्ड कपसाठी संघाची निवड आयपीएलमधून नको- रोहित शर्मा

IPL 2019 : वर्ल्ड कपसाठी संघाची निवड आयपीएलमधून नको- रोहित शर्मा

विश्वचषकासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळं सध्या आयपीएलमधील कामगिरीवर निवड समितीची करडी नजर आहे.

  • Share this:

मुंबई, 5 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामाची उत्सुकता वाढत असताना, या हंगामातूनच इंग्लडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी खेळाडूंची वर्णी लागणार आहे. दरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडीची तयारी जोरदार सुरू असताना, आयपीएलच्या खेळावर खेळाडूंची निवड करणं अयोग्य असल्याचं मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यानं व्यक्त केलं आहे. यापेक्षा त्यांनी मागील चार वर्षांत केलेल्या कामगिरीला अधिक महत्त्व द्यावे, अशी अपेक्षाही रोहितनं व्यक्त केली.

IPLनंतर लगेचच ३० मे पासून इंग्लंडमध्ये विश्वचषकाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळं सध्या आयपीएलमधील कामगिरीवर निवड समितीची करडी नजर आहे. पण आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर कोणत्याही खेळाडूला विश्वचषकात स्थान देऊ नका, ते चुकीचे ठरेल, असे मला वाटते,’’ असं रोहितनं नुकतेच एका कार्यक्रमात व्यक्त केले.भारतीय संघानं गेल्या तीन-चार वर्षात मुबलक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेला खेळ विश्वचषकासाठी ग्राह्य धरावा, अशी इच्छा यावेळी रोहितनं व्यक्त केली.तुर्तास रोहितचं लक्ष्य मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीकडं आहे. मुंबईनं तीनवेळा आयपीएलचे विश्वचषक जिंकले असून, यंदाही विजयी कामगिरी करण्यास रोहितची पलटन सज्ज आहे. दरम्यान मागच्या सामन्यात मुंबईनं चेन्नईचा विजयरथ रोखला, आणि मुंबईनं घरच्या मैदानावर गड राखला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा हा शंभरावा विजय ठरला. आतापर्यंत एकाही संघाला अशी कामगिरी करणं जमलेलं नाही आहे.VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या