News18 Lokmat

IPL 2019 : ...तर विश्रांती नक्की घेऊ, वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत

ऑस्ट्रेलियासोबत मालिका, आयपीएल आणि त्यानंतर होणाऱ्या वर्ल्डकप आधी भारतीय संघाने विश्रांती घ्यावी अशी मागणी होती.

News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2019 06:31 AM IST

IPL 2019 : ...तर विश्रांती नक्की घेऊ, वर्क लोडवर रोहितचं स्पष्ट मत

मुंबई, 20 मार्च : आधी ऑस्टेलियाविरोधात मालिका, त्यानंतर आता शनिवारपासून सुरु होत असलेला आयपीएल यामुळे खेळाडूंवर वर्क लोड वाढत असल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळावी, असे मत काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले होते. यावर भारतीय संघाचा कर्णधआर विराट कोहली यानं IPLमध्ये विश्रांती घ्यायची की नाही हा निर्णय प्रत्येक खेळाडूंनी स्वतःच्या तंदुरुस्तीनुसार घ्यावा, असा सल्ला दिला. आता याच धर्तीवर भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मानेही, विश्रांतीचं आम्ही बघुन घेऊ असे मत व्यक्त केले आहे.

जूनपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपस्पर्धेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंची तंदुरूस्ती हा बीसीसीआयसाठी चिंतेचा विषय आहे. याकरिता खेळाडूंचा ताण कमी करण्यासाठी BCCI संघमालकांशी चर्चा करणार आहे. दरम्यान, खेळाडूंनीही आपली जबाबदारी लक्षात घेऊन विश्रांतीचा निर्णय घ्यावा, असा सल्लाही दिला होता. मात्र खेळाडूंना विश्रांती घ्यावीशी वाटली तर, ते नक्की घेतील, असे मत मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. तसेच, मी भारतीय खेळाडूंशी चर्चा केली आहे, आणि कोणाला आरामाची गरज आहे, असे मला वाटत नाही, असेही रोहित म्हणाला.


Loading...


रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाने 2013,2015, 2017 साली आयपीएलचा किताब जिंकला होता. यंदा चौथ्यांदा रोहितची पलटन आयपीएल जिंकण्यासाठी सज्ज आहे. मुंबईचा पहिला सामना दिल्ली विरोधात वानखेडेवर होणार आहे.


PM Narendra Modi Trailer- सिनेमातून दिसणार विवेक ओबेरॉयचा 'मोदी अवतार'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2019 06:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...