मुंबईकर रो'हिट' शर्मा झळकला Forbes मासिकाच्या कव्हरवर, फॅन्स विचारतात चौथी डबल सेंच्युरी कधी ?

मुंबईकर रो'हिट' शर्मा झळकला Forbes मासिकाच्या कव्हरवर, फॅन्स विचारतात चौथी डबल सेंच्युरी कधी ?

रोहित शर्माकडे विश्वचषक संघाचे उप-कर्णधारपद आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मे : दोन महिने आयपीएलच्या रणसंग्रामानंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते, विश्वचषकाकडे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलचा ताज मिळवला. मात्र आता भारतीय संघाचा उप कर्णधार असलेल्या रोहितकडून विश्वचषकातही अशाच अपेक्षा आहेत. त्यामुळं चुहुबाजूंनी रोहितचं कौतुक होत असताना आता, फोर्ब्स इंडिया या मासिकेनेही रोहितचं कौतुक केलं आहे. फोर्ब्सच्या स्पोर्टस स्पेशल मासिकेच्या कव्हरवर रोहित झळकला आहे. त्यामुळं रोहितचे चाहते त्याच्यावर भलतेच खुश झाले आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं आयपीएलमध्ये चौथे विजेतेपद पटकावले. मात्र, रोहित शर्माला चांगली फलंदाजी करता आली नाही, मात्र कर्णधार म्हणून त्याने घेतलेले निर्णय आणि त्याची रणनीती यांच्या जोरावर मुंबईनं हे विजेतेपद पटकावले. त्यामुळेचे फोर्ब्सनं त्याची निवड केली. दरम्यान चाहत्यांनी मात्र रोहितकडून विश्वचषकात चौथी डबल सेंच्युरी मारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सध्या रोहित शर्मा इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक संघात आहे. एवढेच नाही तर, रोहित शर्माकडे विश्वचषक संघाचे उप-कर्णधारपद आहे. त्यामुळं त्याच्या नेतृत्वाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.30 मेपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी साऊथ आफ्रिकेविरोधात होणार आहे. तर आज भारत आपला पहिला सराव सामना न्युझीलंड विरोधात खेळणार आहे.

खराब फॉर्म असलेल्या खेळाडूंना होणार फायदा

आयपीएलमुळं भारतीय संघातील खेळाडू सध्या फॉर्ममध्ये आबहेत. मात्र रोहित शर्मा, कुलदीप यादव आणि विजय शंकर यांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं या सराव सामन्यात त्यांना फायदा होऊ शकतो.

असे असतील भारताचे सामने

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

वाचा-हिटमॅनने सांगितलं, 2011 च्या वर्ल्ड कप संघातून त्याला का वगळलं?

वाचा- वर्ल्ड कपसाठी विराटला हवा 'हा' परदेशी खेळाडू!

वाचा- World Cup : विराटचं टेंशन वाढलं, सामन्याआधीच महत्त्वाचा खेळाडू जखमी

वाचा- World Cup : ‘या’ खेळाडूमुळं वर्ल्ड कपआधी पाकिस्तान संघातील वाद चव्हाट्यावर

VIDEO: धक्कादायक! पवना नदीत हजारो मृत माशांचा खच

First published: May 25, 2019, 3:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading