IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाआधी टीम इंडियाला झटका, रोहित शर्मा जखमी!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाआधी टीम इंडियाला झटका, रोहित शर्मा जखमी!

14 जानेवारीपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर तीन एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 13 जानेवारी : श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. 14 जानेवारीपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर तीन एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र याआधीच भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. भारतीय संघाच सलामीवीर रोहित शर्मा सरावा दरम्यान जखमी झाला आहे. दरम्यान त्याची दुखापत गंभीर आहे की नाही याबाबत अद्याप कळलेले नाही. मात्र रोहितची दुखापत गंभीर असल्याच भारतासाठी हा मोठा झटका असेल.

नेट प्रॅक्टिस करत असताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्याला सराव सोडून विश्रांती करावी लगाली. दरम्यान रोहितनं सरावादरम्यान जखमी होण्याची ही पहिली वेळ नाही आहे. याआधी श्रीलंका दौऱ्यात रोहितला विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितला पुन्हा संघात घेण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितची खेळी नेहमीच आक्रमक राहिली आहे. त्यामुळं रोहित संघात नसेल तर विराट कोहलीसाठी ही चिंतेची बाब असेल.

वाचा-IND vs NZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, 'हीट'मॅन इज बॅक!

इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार सलामीवीर रोहित शर्मा जेव्हा मुंबईत सराव करत होता तेव्हा चेंडूने त्याच्या उजव्या अंगठ्याला लागला. त्यानंतर फिजिओ नितीन पटेल यांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली, परंतु त्यांच्या पुढील उपचाराची अधिकृत माहिती मिळालेली नाही. या दुखापतीमुळे त्याला पेनसुध्दा पकडता येत नाही आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका चित्रात जेव्हा रोहित शर्माचा एक चाहता मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेला असता, त्याला पेन पकडता आले नाही.

वाचा-दिल्ली कॅपिटल्सचे 4.80 कोटी वसूल, IPLआधीच खेळाडूनं 79 चेंडूत केल्या 147 धावा!

ऑस्ट्रेलिया एकदिवसीय दौरा

14 जानेवारी: पहिली वनडे (मुंबई)

17 जानेवारी: दुसरी वनडे (राजकोट)

19 जानेवारी: तिसरी वनडे (बेंगळुरू)

वाचा-टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, 15 वर्षांच्या युवा खेळाडूला दिली संधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ-विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केदार जाधव, मनीष पांडे, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहल.

Published by: Priyanka Gawde
First published: January 13, 2020, 12:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading