नवी दिल्ली, 8 डिसेंबर: टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma new ODI Captain) आता टी-20 नंतर भारतीय वनडे(ODI) संघाचा कर्णधारपदी विराजमान होणार आहे. बीसीसीआयने रोहितला वनडे कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयकडून संकेत मिळाल्यानंतर विराटने टी-20 विश्वचषकाचे कर्णधारपद सोडले होते, मात्र तो स्वत: वनडेचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा लांबणीवर पडली होती.
दक्षिण आफ्रिकेतील तीन एकदिवसीय मालिकेत (India tour of South Africa) रोहित संघाचा कर्णधार असेल. वनडे आणि टी-20साठी वेगळा कर्णधार नसावा, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे रोहितकडे वनडेचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 2023 च्या वर्ल्डकपलाही फारसा वेळ उरलेला नाही. अशा परिस्थितीत रोहितला एकदिवसीय वर्ल्डकपसाठी संघ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी निवड समिती आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांची इच्छा होती.
रोहितने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी आठ सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे, तर दोन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
The All-India Senior Selection Committee also decided to name Mr Rohit Sharma as the Captain of the ODI & T20I teams going forward.#TeamIndia | @ImRo45 pic.twitter.com/hcg92sPtCa
— BCCI (@BCCI) December 8, 2021
वनडे कर्णधारपद देण्यासोबतच रोहितला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यातही त्याने भारताचे नेतृत्व केले होते. मात्र, काही काळ त्याचा फॉर्म चांगला नव्हता. तर रोहितने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे रहाणेच्या जागी रोहितला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
जानेवारी 2017 मध्ये धोनीने पदाचा राजीनामा दिल्यानंतर वनडे संघाच्या कर्णधारपदाची धूरा विराट कोहलीच्या हातात दिली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Virat kohli