13 डिसेंबर : पहिल्या एकदिवसीय सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा अखेर भारताने वचपा काढला. रोहित शर्माच्या खेळीच्या बळावर भारताने उभारलेल्या 393 धावांचा डोंगर सर करताना श्रीलंकेची दाणादाण उडाली. लंकेचा अवघा संघ 251 धावांवर गारद झाला. भारताने 141 धावांनी शानदार विजय मिळवलाय.
धरमशाला इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं टीम इंडियाचा आपल्याच मायभूमीत दारूण पराभव केला. आज मोहालीत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टाॅस जिंकून पुन्हा गोलंदाजी लंकेनं निर्णय घेतला. पण त्यांच्या निर्णयला कर्णधार रोहित शर्माने सुरुंग लावला. रोहित शर्माने खणखणीत नाबाद 208 धावा करत कारकिर्दीतले तिसरे द्विशतक झळकावले. भारताने लंकेपुढे 393 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
393 धावांचा पाठलाग करताना लंकेचा धुव्वा उडाला. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक १११ धावांची शतकी खेळी केली खरी पण त्यांची झुंज अपयशी ठरली. मॅथ्यूज वगळता कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अवघा संघ निर्धारीत 50 षटकात 251 धावांवर ढेर झाला.
भारताकडून युजवेंद्र चहलने ३, जसप्रीत बुमराहने २ तर भुवनेश्वर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी एक बळी टिपला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कडवी टक्कर होणार हे आता स्पष्ट आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा