• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • विराटच्या गैरहजेरीत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, 'खेळाडूंना स्वातंत्र्य…'

विराटच्या गैरहजेरीत रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, 'खेळाडूंना स्वातंत्र्य…'

Rohit Sharma & Virat Kohli

Rohit Sharma & Virat Kohli

रोहित शर्माने (Rohit Sharma ) विराटच्या गैरहजेरीत मोठो वक्तव्य केले आहे. जे सध्या क्रिकेट जगतात चर्चेत आले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर: न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या तीन टी20 सिरीजमध्ये (IND vs NZ) टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या(Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध अप्रतिम खेळी करत आहे. अशातच रोहितने विराटच्या (Virat Kohli) गैरहजेरीत मोठो वक्तव्य केले आहे. जे सध्या क्रिकेट जगतात चर्चेत आले आहे. विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा खेळाडूंची कामगिरी आणि बेंच-स्ट्रेंथबद्दल मोकळेपणाने बोलला आहे. विराट कोहलीनंतर  टी20 फॉरमॅटच्या कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली आहे. तसेच, मुख्य कोच रवी शास्त्री यांचा कार्यकाल संपल्यानंतर राहुल द्रविड याची निवड मुख्य कोच म्हणून करण्यात आली आहे. त्यामुळे टीम इडिंयाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. टी20 सिरीजमधील दुसऱ्या मॅचनंतर रोहितीने पत्रकार परिषदेत खुलेपणाने संवाद साधला. यावेळी तो म्हणाला, 'कर्णधार म्हणून माझे काम हे असेल की नवीन खेळाडू जेव्हाही खेळायला येतात, तेव्हा त्यांना नेहमीच आरामदायक वाटेल. इतर बाह्य गोष्टींची चिंता न करता खेळाडूंना ते स्वातंत्र्य दिले जावे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे मैदानावर येताच त्यांनी फक्त खेळाचा विचार करावा.' असे मत त्याने यावेळी व्यक्त केले. तसेच, कठीण परिस्थितीत आम्ही चांगली कामगिरी केली, न्यूझीलंडचा संघ शानदार आहे. सामन्यात एका विकेटची चर्चा होती, ज्यामुळे आम्हाला गती मिळू शकली असती. आमची बेंच स्ट्रेंथ खूप मजबूत आहे, नवीन खेळाडू सातत्याने क्रिकेट खेळत आहेत. असे सांगत खेळाडूंचे रोहितने कौतुक केले. बेंच स्ट्रेंथबाबत रोहित शर्मा म्हणाला की हा खूप तरुण संघ आहे, अनेक खेळाडूंनी खूप कमी खेळ खेळले आहेत. अनेक खेळाडू संधीची वाट पाहत आहेत, पण त्यांची वेळ नक्कीच येईल. प्रत्येकाला संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न असेल अशी आशादेखील रोहितने यावेळी व्यक्त केली. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या टी-20 सिरीजमध्ये अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडलेला विराट कोहलीही या मालिकेत खेळत नाहीये, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे. व्यंकटेश अय्यरने पहिल्या T20 मध्ये पदार्पण केले आणि हर्षल पटेलने दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडविरुद्धच्या या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत अनेक खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडलेला विराट कोहलीही या मालिकेत खेळत नाहीये, अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळत आहे. व्यंकटेश अय्यरने पहिल्या T20 मध्ये पदार्पण केले आणि हर्षल पटेलने दुसऱ्या सामन्यात पदार्पण केले.
  Published by:Dhanshri Otari
  First published: