News18 Lokmat

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात रोहितचा फुटबॉल, पाहा नेमकं काय घडलं

मुंबईनं ४.२ षटकातच म्हणजे केवळ २६ चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली. पण त्यानंतर रोहित आणि सुर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 05:22 PM IST

VIDEO : क्रिकेटच्या मैदानात रोहितचा फुटबॉल, पाहा नेमकं काय घडलं

मुंबई, 13 एप्रिल : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत विजयाची हॅट्रिक केल्यानंतर आत्मविश्वास गगनाला भिडलेला असताना, आज रोहितच्या उपस्थितीत मुंबईचा संघ राजस्थान विरोधात आपल्या घरच्या मैदानात खेळत आहेत. दरम्यान आजच्या सामन्यात सलामीला फलंदाजी करण्यासाठी उतरलेले रोहित शर्मा दुखापतीनंतर चांगल्या फॉर्ममध्ये दिसला.

मुंबईचे सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्मा यांनी संघाला धडाकेबाज सुरुवात करून दिली. त्यामुळे ४.२ षटकातच म्हणजे केवळ २६ चेंडूत मुंबईने अर्धशतकी मजल मारली. रोहित शर्मानं 32 चेंडूत 47 धावा केल्या पण जेफ्रा आर्चरच्या चेंडूवर बटलरनं उत्तम झेल घेतला आणि फॉर्ममध्ये असलेला रोहित बाद झाला.दरम्यान, त्याआधी गौतमच्या आठव्या ओव्हरमध्ये एक मजेशीर प्रसंग घडला. क्रिकेटच्या मैदानावर बॅटिंग करत असताना चक्क कर्णधार रोहित शर्मा फुटबॉल खेळला. गौथमनं टाकलेल्या चेंडूवर स्वत:चा बचाव करताना रोहितनं बॅट एवजी पायानं बॉल मारला. त्यामुळं रोहितसह, समालोचक आणि प्रेक्षकांनाही हसु आवरलं नाही.

Loading...दरम्यान हा सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी एक अनोखा विक्रम केला. मुंबईच्या संघानं आपल्या सामन्याचं द्विशतक तर, रोहितनं मुंबईचा कर्णधार म्हणून आपलं शतक पूर्ण केलं. याआधी सोमरसेट या बीग बॅश लीग मधल्या संघानं 199 सामने खेळण्याचा विक्रम केला होता. पण आता ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 200 सामने खेळण्याचा हा विक्रम मुंबई इंडियन्सने शनिवारी नावावर केला. तर, रोहितनं कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून आज 100वा सामना खेळला. त्यानं आतापर्यंत आयपीएलमध्ये 95, तर चॅम्पियन्स ट्वेंटी-20 मध्ये पाच सामन्यांत मुंबईचे नेतृत्व केले होते.


VIDEO : मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंवर पलटवार, मनसेला म्हणाले...
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 05:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...