Home /News /sport /

खराब कामगिरीनंतर रोहितने मागितला ब्रेक, 3 सीरिजसाठी होणार टीम इंडियाची निवड!

खराब कामगिरीनंतर रोहितने मागितला ब्रेक, 3 सीरिजसाठी होणार टीम इंडियाची निवड!

आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. 74 सामन्यांपैकी फक्त 5 मॅच शिल्लक आहेत. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

    मुंबई, 22 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) आता शेवटाकडे येऊन ठेपली आहे. 74 सामन्यांपैकी फक्त 5 मॅच शिल्लक आहेत. टीम इंडियाचा (Team India) कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) स्पर्धेतून बाहेर झाली आहे. पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईची टीम शेवटच्या क्रमांकावर राहिला. रोहित शर्माचा खराब फॉर्म हेदेखील मुंबईच्या निराशाजनक कामगिरीचं प्रमुख कारण ठरला. आयपीएलच्या या हंगामात रोहित शर्माला एकही अर्धशतक करता आलं नाही. आयपीएल 2022 ची फायनल 29 मे रोजी होणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची तयारी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात 9 जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात 5 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार रोहित शर्माने बीसीसीआयकडून (BCCI) आयपीएल संपल्यानंतर ब्रेक मागितला आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हा वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयपीएलमध्ये रोहित मुंबईकडून सगळ्या 14 मॅच खेळला, त्यामुळे इंग्लंड दौऱ्याआधी त्याला ताजंतवानं व्हायचं आहे. दक्षिण आफ्रिका सीरिजसोबतच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठीही टीमची निवड होणार आहे. दोन टीमची निवड होणार दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 सीरिज 9 ते 19 जून दरम्यान होणार आहे. ही सीरिज संपण्याआधीच टीम इंडियाला इंग्लंडला रवाना व्हावं लागणार आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी वेगळ्या टीमची निवड होणार आहे, यासाठी शिखर धवनला टीमचं नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे. 15 जूनला सीनियर टीम इंग्लंडला रवाना होणार आहे. 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध एकमेव टेस्ट होणार आहे. मागच्या वर्षी न झालेल्या सीरिजची ही अखेरची मॅच आहे. कोरोनामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातली शेवटची टेस्ट स्थगित करण्यात आली होती. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. टेस्ट सीरिजनंतर भारतीय टीम इंग्लंडमध्ये 3 टी-20 आणि 3 वनडे मॅचची सीरिजही खेळणार आहे. याशिवाय 26 आणि 28 जूनला आयर्लंडविरुद्ध 2 टी-20 मॅचही होणार आहेत, या सीरिजसाठीही युवा खेळाडूंना संधी मिळेल, तसंच कोच म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण आयर्लंडला जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ipl 2022, Mumbai Indians, Rohit sharma, Team india

    पुढील बातम्या