VIDEO : वय वर्ष अवघे तीन...रोहितच्या चिमुरडीला लागले स्पॅनिश शिकण्याचे वेध

VIDEO : वय वर्ष अवघे तीन...रोहितच्या चिमुरडीला लागले स्पॅनिश शिकण्याचे वेध

आज मुंबई इंडियन्स संघाच्या सामन्यापूर्वी तीन महिन्यांची समायरा अभ्यासात गुंग असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 10 एप्रिल : एकीकडं मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधाराच्या अनुपस्थितीमुळं अडचणीत सापडला असताना, दुसरीकडं या कर्णधाराची लेक सोशल मीडिया गाजवत आहे.आयपीएलमध्ये आपल्या संघाला टॉप फोरमध्ये स्थान मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेला रोहित सराव सामन्यात दुखापतग्रस्त झाला.

अंकतालिकेत, मुंबई इंडियन्स पाच सामन्यांत तीन विजयांसह पाचव्या स्थानावर आहे.दरम्यान, रोहित सामन्यात खेळत नसला तरी, संघाचं मनोबल उंचावण्यासाठी रोहितची पत्नी आणि त्याची मुलगी नेहमी हजर असताना. पण, आज सामन्यापूर्वी तीन महिन्यांची समायरा अभ्यासात गुंग झाली आहे. रोहितची चिमुरडी चक्क स्पॅनिश शिकत आहे. रोहितने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Spanish lessons at 3months #muybien

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव समायरा असं ठेवलं. काही दिवसांपूर्वी ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला होता. केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. त्यात भर म्हणून समायरा चक्क स्पॅनिश भाषा समजण्याचा प्रयत्न करत आहे.

याआधी धोनीची लेक झिवानं सहा भारतीय भाषांमध्ये एक परिक्षा दिली होती. आता झिवानंतर समायरलाही एक नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

VIDEO : भाजपच्या सभेत तुफान राडा, महाजनांसमोर माजी आमदाराला लाथाबुक्क्याने मारहाण

First published: April 10, 2019, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading