मुंबई, 17 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. यात भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्या करीत असून रोहित शर्मा सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या विजयानंतर आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवत आहे. रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिच्या भावाचं लग्न होणार असून त्याच्या संगीत सोहळ्यात रोहित शर्माने धम्माल डान्स केला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अहमदाबाद येथील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर भारताने मालिकेत 2-1 ने विजयी आघाडी घेऊन मालिका जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग चौथ्यांदा कसोटीत विजय मिळवला. परंतु यानंतर लगेचच 17 मार्च पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातून रोहित शर्माने विश्रांती घेतली. या मालिकेतील उर्वरित दोन मॅचमध्ये रोहित खेळणार आहे. रोहितने मेहुण्याच्या लग्नासाठी वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातून विश्रांती घेतल्याचे कळते.
Rohit Sharma with his wife Ritika Sajdeh dancing his brother-in-law marriage - What a beautiful video! pic.twitter.com/y2Ec1NnF1f
— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 17, 2023
मेहुण्याच्या संगीत सोहोळ्यात रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून रोहितला अशा प्रकारे डान्स करताना त्याच्या चाहत्यांनी याआधी पाहिलेले नाही. रोहित आपली पत्नी आणि मेहुण्यासोबत संगीत सोहोळ्यात पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसतोय. या व्हिडिओवर त्याचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, India vs Australia, Rohit sharma