Home /News /sport /

'प्रमोशन' होताच रोहित झाला 'अलिबाग'कर, 4 एकर जमिनीसाठी मोजले तब्बल इतके रुपये!

'प्रमोशन' होताच रोहित झाला 'अलिबाग'कर, 4 एकर जमिनीसाठी मोजले तब्बल इतके रुपये!

भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही अलिबागची (Alibag) भूरळ पडली आहे. रोहित शर्माने अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदराजवळील सारळ या गावात जमिन विकत घेतली आहे.

अलिबाग, 14 डिसेंबर : भारताच्या टी-20 आणि वनडे टीमचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यालाही अलिबागची (Alibag) भूरळ पडली आहे. रोहित शर्माने अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदराजवळील सारळ या गावात 4 एकर जागा 9 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. खरेदीखत रजिस्टर करण्यासाठी रोहित शर्मा त्याची पत्नी रितीकासह अलिबागच्या दुय्यम निबंधक कार्यालयात आला होता. रोहित शर्मा आल्याचे कळताच त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. याआधी विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आणि अजित आगरकर यांनीही अलिबागमध्ये जागा विकत घेतली होती.
Published by:Shreyas
First published:

Tags: Rohit sharma

पुढील बातम्या