एडिलेड, 12 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियामध्ये टी20 वर्ल्ड-कप स्पर्धा सुरू आहे. भारतीय टीम सेमी-फायनलपर्यंत पोहोचली आणि फायनलमध्ये पोहोचेल, अशीही शक्यता होती; पण सेमी-फायनलमध्ये इंग्लंडच्या टीमने उत्कृष्ट कामगिरी करून भारताचा पराभव केला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टीम टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. इंग्लंडने 10 विकेट्सने भारताला हरवून फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आणि भारताचं चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं. इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर केवळ भारतीय क्रिकेटप्रेमीच नाही, तर टीममधल्या खेळाडूंनाही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्माला पराभवानंतर अश्रू अनावर झाले.
रोहित शर्मा रडत असल्याचं चित्रण एका कॅमेऱ्यात झालंय. त्याचे अश्रू पाहून फॅन्सही हळहळले. कोच राहुल द्रविड रोहितला सांभाळताना एका व्हिडिओमध्ये दिसत आहेत. एका रिपोर्टनुसार मॅच हरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित खूप भावूक झाला. तो खूप रडत होता आणि अन्य खेळाडूंनी त्याला सावरलं
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, पराभवानंतर भारतीय टीमचे कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी टीमला संबोधित केलं. या वेळी द्रविड म्हणाले, की टीम खूप चांगली खेळली आणि प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीचा अभिमान वाटला पाहिजे. त्याच वेळी रोहितने सर्वांचे आभार मानले.
हेही वाचा: Team India: सेमी फायनलमध्ये हरले, तरीही झाले करोडपती; पाहा भारतीय खेळाडूंना किती मिळालं बक्षिस?
रोहितला अश्रू अनावर-
टीमच्या काही सदस्यांनी सांगितलं, की त्यांना याआधी अनेक पराभवांचा सामना करावा लागला आहे. परंतु रोहितला इतक्या खचलेल्या अवस्थेत आजपर्यंत पाहिलं नाही. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर सर्व जण आपलं सामान पॅक करत होते, त्या वेळी टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज आला. प्रत्येकाला भारतात परतण्यापूर्वी एका छोट्या मीटिंगला येण्यास सांगण्यात आलं आणि त्या वेळी सर्वांनी एकमेकांना मिठी मारली.
ग्रुपमध्ये आघाडीवर होता भारत-
टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने चांगला खेळ केला; मात्र महत्त्वाच्या सेमी-फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. यासोबत भारत आयसीसी इव्हेंट्सच्या नॉकआउटमध्ये पुन्हा एकदा फ्लॉप झाला. ग्रुप 2 मध्ये भारत 5 पैकी 4 मॅच जिंकून आघाडीवर होता.
I Stand with Team India
We all have to stand for our nation nd team players! Win or loose its just a part of Game #RohitSharma #ViratKohli #TeamIndia pic.twitter.com/cAYSd6v2HY — Vedant Birla (@birla_vedant) November 10, 2022
भारताने आयसीसी ट्रॉफी जिंकून उलटलं एक दशक-
भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. जवळपास एक दशक भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. एमएस धोनीनंतर रोहित शर्मा भारताला विजेतेपद मिळवून देऊ शकेल, असं वाटत होतं; पण सेमी-फायनलमधून भारताला बाहेर पडावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.