Happy Birthday Rohit: रोहित शर्माची कोलकाता शहरातली ही भानगड माहीत आहे का?

Happy Birthday Rohit: रोहित शर्माची कोलकाता शहरातली ही भानगड माहीत आहे का?

मुंबईकर रोहितसाठी वानखेडे नाही तर ईडन गार्डन आहे खास

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : क्रिकेटच्या मैदानात हिटमॅन या नावानं बहुचर्चित असलेला रोहित शर्मा आज 32व्या वर्षात पदार्पण करत आहे. या मुंबईकर खेळाडूनं बोरीवली ते क्रिकेट मैदान असा अखंड प्रवास केला. त्यामुळं आज मुंबईकरांच्या सचिननंतर कोणत्या खेळाडूचं नाव असले तर, तो खेळाडू आहे रोहित शर्मा.

अखंड परिश्रमानंतर 2007 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या या हिटमॅनची ही एक जागा खास आहे. त्याला तसं खास कारण ही आहे. ती जागा म्हणजे कोलकाता. मुंबईकरत रोहित शर्माचं कोलकाता प्रेम खरतर 2008 सालापासून आहे.

रोहितचं हे प्रेम म्हणजे अगदी खास, म्हणजे रोहितची पत्नी रितीका हिच्याही आधी त्याचं कोलकाताशी खास नातं आहे. कारण २००८ साली आयपीएलच्या पहिल्या हंगामात याच मैदानावर रोहितने पदार्पण केलं होतं. एवढचं नाही तर याच मैदानावर आपल्या कसोटी पदार्पणातच रोहितनं 177 धावा याच मैदानावर केल्या होत्या. तर, एकदिवसीय सामन्यात 264 धावांची विक्रमी खेळी रोहितनं ईडन गार्डनवर केली. रोहित एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीवेळा 200 धावा करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे.

यानंतर रोहित आणि ईडन गार्डन यांच वेगळचं नातं निर्माण झालं. आयपीएलमधलं पहिलं शतक, कर्णधार म्हणून पदार्पण, पहिलं आयपीएल विजेतेपद अशा अनेक महत्वाच्या घटना रोहितने ईडन गार्डन्स मैदानाच्या साथीने अनुभवल्या आहेत. एवढचं नाही तर आपल्या पडत्या काळातही रोहितनं रणजी सामन्यात मुंबईकडून खेळत असताना, ईडन गार्डनवर 200 धावांची खेळी होती. या खेळीच्या जोरावर मुंबईनं सामना जिंकला होता. त्यामुळं रोहित शर्मा आणि ईडन गार्डन्स मैदानाचं नात अधिकच दृढ झालं आहे. मुंबईकर रोहित शर्मा हा वानखेडेपेक्षा ईडन गार्डनला आपलं खास मैदान मानतो.

SPECIAL REPORT : राज ठाकरेंचा 'X फॅक्टर', आता पुढची तयारी...

First published: April 30, 2019, 7:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading