Home /News /sport /

IND vs ENG : रोहित शर्मानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना, बर्मिंघम टेस्टवर संकट!

IND vs ENG : रोहित शर्मानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना, बर्मिंघम टेस्टवर संकट!

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 1 जुलैपासून बर्मिंघममध्ये टेस्ट मॅच होणार आहे, पण या मॅचवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जून : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 1 जुलैपासून बर्मिंघममध्ये टेस्ट मॅच होणार आहे, पण या मॅचवर कोरोनाचं संकट ओढावलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. यानंतर आता इंग्लंडचा विकेट कीपर बेन फोक्स (Ben Foakes) हादेखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे फोक्स आता न्यूझीलंडविरुद्ध हेडिंग्लेमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये खेळणार नाही. फोक्सऐवजी जॉनी बेयरस्टो विकेट कीपिंग करत आहे. फोक्स टेस्टच्या तिसऱ्या दिवशी पाठीत दुखत असल्यामुळे विकेट कीपिंग करत नव्हता, त्याच्याऐवजी बेयरस्टोला ही जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर संध्याकाळी फोक्सची टेस्ट पॉझिटिव्ह आली. बेन फोक्सचा बदली खेळाडू म्हणून सॅम बिलिंग्सला इंग्लंडच्या टीममध्ये सामील करून घेण्यात आलं आहे. आयसीसीने हिरवा सिग्नल दिल्यानंतर बिलिंग्स चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होईल तेव्हा थेट इंग्लंडच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दिसेल. बिलिंग्स टी-20 ब्लास्टमध्ये केंटकडून खेळत होता, पण इंग्लंडने बोलावल्यानंतर तो लगेच टीममध्ये आला. हेडिंग्ले टेस्टच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने त्यांच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 168/5 एवढा स्कोअर केला, ज्यामुळे त्यांची आघाडी 137 रनची झाली. फोक्सशिवाय कोणालाही कोरोना नाही बेन फोक्स याच्याशिवाय इंग्लंडच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला कोरोनाची लागण झाली नसल्याचं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे. तसंच इतर खेळाडू कोरोना प्रोटोकॉलचं पालन करत आहेत आणि गरज पडली तर इतर खेळाडूंचीही कोरोना टेस्ट केली जाईल, असंही बोर्डाने सांगितलं. रोहितलाही कोरोना फोक्सच्या आधी रोहित शर्मा याचीही रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. कोरोना झाल्यामुळे रोहित सध्या आयसोलेशनमध्ये आहे. आरटीपीसीआर टेस्टनंतरच रोहित बर्मिंघम टेस्ट खेळणार का नाही, हे स्पष्ट होईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात मागच्या वर्षी झालेल्या टेस्ट सीरिजमधली पाचवी टेस्टही कोरोनामुळे झाली नव्हती. त्याच सीरिजची पाचवी टेस्ट 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Rohit sharma

    पुढील बातम्या