आता येऊ नको! रोहित शर्माचा शतकापूर्वी पावसाला दिला इशारा, पाहा VIDEO

आता येऊ नको! रोहित शर्माचा शतकापूर्वी पावसाला दिला इशारा, पाहा VIDEO

भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवशी शतकी खेळी केली. त्याने अजिंक्य रहाणेच्या साथीनं भारताचा डाव सावरला.

  • Share this:

रांची, 20 ऑक्टोबर : भारताचा सलामीवीर रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पहिल्या डावात नाबाद 117 धावांची खेळी केली आहे. या मालिकेतील त्याचं तिसरं तर कारकिर्दीतील 6 वे शतक आहे. दरम्यान, आता रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा 95 धावांवर नाबाद असताना पावसाची चिन्हे दिसतं होती. त्यावेळी रोहित आभाळाकडं पाहून आता नाही असं म्हणत आहे.

रांचीत सुरु असलेल्या कसोटी मालिकेत पहिल्या दिवशी शनिवारी रोहित शर्मा 95 धावांवर खेळत होता. त्यावेळी आकाशात ढग जमा झाले होते. तसेच हलकासा पाऊसही पडत होता. तेव्हा रोहितनं आकाशाकडे बघत म्हटलं की आता नाही. रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंधुक प्रकाश आणि खराब हवामानामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. रोहितने षटकाराच्या सहाय्यानं शतक साजरं केलं. दिवसाचा खेळ संपला तेव्हा 117 धावांवर तर अजिंक्य रहाणे 83 धावांवर नाबाद होते. भारताने दिवसअखेर 3 बाद 224 धावा केल्या.

वाचा : कर्णधाराच्या हकालपट्टीनंतर शेअर केला VIDEO, क्रिकेट बोर्डाला मागावी लागली माफी

एका कसोटी मालिकेत सर्वाधिक षटाकर मारण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे. रोहितने आतापर्यंत 16 षटकार मारले असून शिम्रॉन हेटमायरला मागे टाकलं आहे. त्यानं 2018-19 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत दोन कसोटीमध्ये 15 षटकार मारले होते.

अरे हा तर चमत्कार! सामन्यात कॅच पकडताना दिसला सुपरमॅन, पाहा LIVE VIDEO

नाणेफेकीत दोन कर्णधारांना हरवल्यावर विराटला आवरलं नाही हसू, पाहा VIDEO

SPECIAL REPORT : शरद पवारांची 'ही' सभा निवडणुकीच्या इतिहासात लिहिणारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2019 09:31 AM IST

ताज्या बातम्या