मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: रोहित शर्मा @400, टीम इंडियाच्या कॅप्टननं केला हा नवा रेकॉर्ड

Ind vs SA: रोहित शर्मा @400, टीम इंडियाच्या कॅप्टननं केला हा नवा रेकॉर्ड

रोहित शर्माचे 400 टी20 सामने

रोहित शर्माचे 400 टी20 सामने

Ind vs SA: रोहितच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलाय. गुवाहाटी टी20 हा रोहित शर्माच्या टी20 कारकीर्दीतला 400 वा सामना ठरला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 2 ऑक्टोबर: रोहित शर्मानं गुवाहाटीतल्या दुसऱ्या टी20त टीम इंडियाला दमदार सुरुवात करुन दिली. सलामीला येत भारतीय कर्णधारानं 37 बॉल्समध्ये 43 धावां फटकावल्या. याच सामन्यात रोहितच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेलाय. गुवाहाटी टी20 हा रोहित शर्माच्या टी20 कारकीर्दीतला 400 वा सामना ठरला. भारताकडून 400 सामने खेळणारा रोहित हा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला.

रोहित @400

रोहित शर्मानं आतापर्यंत 140 आंतरराष्ट्रीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधीत्व केलं आहे्. तर आयपीएलमध्ये रोहितनं 227 मॅचेस खेळल्या आहेत. याशिवाय इतर 33 टी20 सामन्यांसह रोहितनं 400 सामने पूर्ण केले आहेत.

सर्वाधिक टी20 खेळणारे भारतीय

रोहित शर्मा  - 400

दिनेश कार्तिक - 368

महेंद्रसिंग धोनी - 361

हेही वाचा - Ind vs SA: धक्कादायक... गुवाहाटीच्या सामन्यात मध्येच थांबला खेळ, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

रोहित- राहुलची दमदार सुरुवात

दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं लोकेश राहुलसह भारतीय डावाला दमदार सुरुवात करुन दिली. रोहितनं 37 बॉलमध्ये 7 फोर आणि एका सिक्ससह 43 धावा फटकावल्या. दरम्यान रोहितच्या टी20 कारकीर्दीतला हा 400 वा सामना ठरला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनं आपल्या टी20 कारकीर्दीतलं 20वं अर्धशतक साजरं केलं. राहुलनं अवघ्या 28 बॉलमध्ये 5 फोर आणि 4 सिक्सह 57 धावा फटकावल्या. या दोघांनी सलामीच्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी साकारली. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजनं या दोघांनाही माघारी धाडलं.

First published:

Tags: Cricket, Cricket news, Rohit sharma, Sports, T20 world cup, Team india