'हिटमॅन' रोहित शर्माचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक

लवकरच रोहित शर्मा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2017 08:37 PM IST

'हिटमॅन' रोहित शर्माचं मुंबई इंडियन्समध्ये कमबॅक

01 एप्रिल : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएलमध्ये दोन वेळा विजेतेपद पटकवणाऱ्या या टीमचा कर्णधार रोहित शर्माची तब्येत आता कमालीची सुधारली आहे. आणि लवकरच रोहित शर्मा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. या टीममधील अजून एक दमदार खेळाडू हार्दिक पांड्या सुद्धा त्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहे. या बद्दलची माहिती मुंबई इंडियन्सने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.

टीम चा कर्णधार रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आणि या दुखापतीला घेऊन त्यांना एक ऑपरेशन सुद्धा कराव लागल होतं. याचप्रमाणे, हार्दिक पांड्या सुद्धा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या प्रॅक्टिस मॅचच्या दरम्यान खांद्याला दुखापत झाली होती, आणि याच कारणावरुन हार्दिक पांड्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सहभाग घेऊ शकला नाही. परंतू आता हार्दिक पांड्या पुन्हा एकदा आयपीएल प्रैक्टिस साठी सज्ज झाला आहे.

 रोहित शर्मा समोरील आव्हानं...

रोहित शर्मा आयपीएल 2017 साठी जेव्हा मैदानात उतरेल त्यावेळी, त्याच्या खांद्यावर महत्वपूर्ण जवाबदारी असणार आहेत. ती म्हणजे मागील सिरीजमधील मुंबई इंडियन्सच्या खराब खेळीला सुधारवण्याचं आव्हान त्याच्या टीमसमोर आणि रोहित शर्मावर आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स या टीममध्ये खेळला आहे. आणि यावेळी मुंबई इंडियन्ससहीत  टीमची जबाबदारी रोहित शर्मावर असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 08:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...