दुबई, 4 नोव्हेंबर: यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India) पहिला विजय मिळवण्यात यश आलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध दारूण पराभव झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानचा 66 रनने पराभव केला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभव का स्वीकारावा लागला याचे कारण हिटमॅन रोहित शर्माने (Rohit Sharma) सांगितले आहे.
अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. या विजयात हिटमॅन रोहित शर्माची मोलाची कामगिरी पाहायला मिळाली. यापूर्वी, झालेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताला दारुण पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर क्रिकेप्रेमींना टीम इंडियावर अनेक आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर अफगाणिस्तानसोबत झालेल्या सामन्यानंतर रोहित शर्माने भाष्य केले आहे.
आजच्या सामन्यातील भारतीय संघाचा अॅप्रोच वेगळा राहिला. कदाचित पहिल्या दोन सामन्यांमध्ये देखील असा अॅप्रोच राहिला असता पण तसे झाले नाही. पण जेव्हा तुम्ही बराच वेळ खेळत राहता तेव्हा असे घडते. काही निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते आणि पहिल्या दोन सामन्यांमध्ये असेच घडले. विश्वचषकात खेळण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू WTC सामना, इंग्लंडचा प्रदीर्घ दौरा, आणि आयपीएल खेळून थकले होते.
तसेच तो पुढे म्हणाला, जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा तुमच्याकडून योग्य निर्णय घेणे अपेक्षित असते. तुम्ही मानसिकदृष्ट्या फ्रेश राहाल याची काळजी घ्यावी लागेल.
पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा त्यामुळे क्रिकेट प्रेमिंनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावरही रोहितने भाष्य केले आहे. तो म्हणाला, पहिल्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी झाली नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्ही एका रात्रीत वाईट खेळाडू बनलो. जर तुमचा दोन सामन्यांत पराभव झाला तर संघ वाईट ठरत नाही. सर्व खेळाडू वाईट आहेत, संघ चालवणारे लोक वाईट आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही.
अशा परिस्थितीत तुम्हाला न घाबरता खेळावे लागेल अगदी परिणामांची चिंता न करता…!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, T20 cricket, T20 league, T20 world cup