'आरे'वरून रोहित शर्मा भडकला,'... त्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही'

'आरे'वरून रोहित शर्मा भडकला,'... त्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही'

भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मानं मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांच्या कत्तलीनंतर प्रशासनाला प्रश्न विचारला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 ऑक्टोबर : भारताचा हिटमॅन रोहित शर्माने आरेवरून मेट्रो प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. दोन दिवसांपूर्वी मेट्रोच्या कारशेडसाठी मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे रात्रीची तोडण्यात आली. त्यावरून सध्या पर्यावरणवादी आणि राज्यातील नागरिकांनी आंदोलन उभा केलं आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेत वृक्षतोडीला 21 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली आहे.

रोहित शर्माने ट्वीटरवरून पोस्ट करत म्हटलं की, जीवनात ज्या गोष्टी गरजेच्याच असतात त्या नष्ट करून कसं चालेल. आरे जंगलामुळे मुंबईत हरितपट्टा तयार झाला आहे आणि त्यामुळेच वातावरण संतुलित राहिलं आहे. याच आरेच्या मुळावर घाव घालणं चुकीचं आहे. मेट्रो प्रशासनाच्या या चुकीनं इथं राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण होणार आहे त्याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही.

आरे मिल्क कॉलनी मुंबईच्या पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इथे बागा, नर्सरी आणि तलाव आहेत. यामुळे छोटा काश्मीर हा एक पिकनिक स्पॉट आहे. जवळच संजय गांधी नॅशनल पार्क असल्याने हा परिसर हिरवागार आहे. आरे कॉलनीच्या भागात एक फेरफटका मारला तरी मुंबईच्या कोलाहलातून थोडी उसंत मिळते.

आरेतील वृक्षतोडीसंदर्भात ग्रेटर नोएडा येथील विधि शाखेचा विद्यार्थी रीशव रंजन याने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना पत्र लिहले होते. या पत्राचे रुपांतर याचिकेत करून सर्वोच्च न्यायालयाने आज तातडीची सुनावणी केली. सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली तर संजय हेगडे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू मांडली.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तोपर्यंत आरेतील वृक्षतोड करता येणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे. सुनावणी दरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारले की आरेतील जंगल हे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येते का आणि तसे असेल तर सरकराने यामध्ये काही बदल केले आहेत का? पुढील सुनावणी दरम्यान यासंदर्भातील पुरावे सादर करण्यास न्यायालयाने सांगितले आहे. न्या.अरुण मिश्रा आणि न्या.अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

युतीला मेगाभरती पडली भारी, बंडोबांनी दंड थोपडले दारोदारी, पाहा हा VIDEO

First published: October 8, 2019, 5:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading