मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA T20: सूर्यानंतर 'किलर मिलर'ची वादळी खेळी, पाहा रोहितनं कसं केलं मिलरचं कौतुक? Video

Ind vs SA T20: सूर्यानंतर 'किलर मिलर'ची वादळी खेळी, पाहा रोहितनं कसं केलं मिलरचं कौतुक? Video

रोहितकडून मिलरचं कौतुक

रोहितकडून मिलरचं कौतुक

Ind vs SA T20: सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मैदानातच मिलरचं कौतुक केलं. रोहितनं क्विंटन डी कॉकच्या खेळीलाही दाद दिली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

गुवाहाटी, 02 ऑक्टोबर: गुवाहाटीत आज मॅच बघायला स्टेडियममध्ये आलेल्या आणि संध्याकाळपासून टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनसमोर डोळे लावून बसलेल्या क्रिकेट चाहत्यांना एक चांगला खेळ पाहायला मिळाला. गुवाहाटीच्या स्टेडियममध्ये रविवारी तब्बल 458 धावांचा पाऊस पडला. त्यात एक दोन नव्हे तर 25 सिक्सर्स होते. गुवाहाटीतल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातल्या दुसऱ्या टी20त केवळ आणि केवळ बॅट्समन्सचंच वर्चस्व राहिलं आणि रबाडा, एनगिडी, नॉकिया किंवा अर्शदीप, हर्षल पटेल, अक्षर पटेल अशा सगळ्याच बॉलर्सची चांगलीच धुलाई झाली.

मिलरची वादळी खेळी

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलरचं शतक हे या सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं. 238 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघ इतकी मोठी मजल मारेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण डेव्हिड मिलरच्या इनिंगमुळे गुवाहाटीत दक्षिण आफ्रिकेनं चांगलीच फाईट दिली. मिलरनं अवघ्या 37 बॉल्समध्ये 8 फोर आणि 7 सिक्ससह नाबाद 106 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली मिलरचं हे दुसरं शतक ठरलं. मिलरनं अनुभवी क्विंटन डी कॉकच्या (69) साथीनं 174 धावांची अभेद्य भागीदारीही साकारली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 221 धावांची मजल मारता आली. पण विजयापासून त्यांचे प्रयत्न 16 धावांनी दूर राहिले.

हेही वाचा - Ind vs SA T20: गुवाहाटीत टीम इंडिया जिंकली पण रोहितचं टेन्शन पुन्हा वाढलं... पाहा नेमकं काय झालं?

रोहितकडून मिलरची प्रशंसा

सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मानं मैदानातच मिलरचं कौतुक केलं. रोहितनं क्विंटन डी कॉकच्या खेळीलाही दाद दिली. रोहितसह विराट कोहलीनंही मिलरच्या या खेळीला दाद दिली. बीसीसीआयनं हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

ऐतिहासिक मालिकाविजय

तीन सामन्यांच्या या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं पहिल्यांदाच मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी20 मालिका जिंकली. 2015-16 च्या मोसमात दक्षिण आफ्रिकन संघ टी20 मालिका खेळण्यासाठी पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेन ती मालिका 2-0 अशा फरकानं जिंकली होती. त्यानंतर 2019 आणि 2020 साली दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं टी20 मालिका 1-1 आणि 2-2 अशा बरोबरीत राखल्या होत्या. त्यामुळे मालिका गमावण्याची वेळ आतापर्यंत त्यांच्यावर आली नव्हती. पण गुवाहाटीत भारतीय संघानं तो इतिहास पुसून टाकला.

First published:

Tags: Cricket news, Sports, T20 world cup 2022, Team india