मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: रोहितनं वर्षभरापूर्वी दिलेला शब्द पाळला... 2007 ची 'ती' जोडी पुन्हा मैदानात

T20 World Cup: रोहितनं वर्षभरापूर्वी दिलेला शब्द पाळला... 2007 ची 'ती' जोडी पुन्हा मैदानात

2007 चा विश्वविजेता संघ

2007 चा विश्वविजेता संघ

T20 World Cup: भारतीय निवड समितीनं त्यासाठी 15 सदस्यीय संघाती आज घोषणा केली. महत्वाची बाब म्हणजे या संघात 2007 सालच्या विश्वचषक संघातील दोन खेळाडूंचा समावेश आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 12 सप्टेंबर: 2007 साली आयसीसीनं दक्षिण आफ्रिकेत पहिल्यावहिल्या टी20 विश्वचषकाचं आयोजन केलं. त्या पहिल्याच वर्ल्ड कप स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या टीम इंडियानं जगज्जेता होण्याचा मान मिळवला. 2007 नंतर आतापर्यंत झालेल्या 7 विश्वचषक स्पर्धांमध्ये टीम इंडियाला एकदाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. पण ऑस्ट्रेलियात होणारा आगामी टी20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारतीय निवड समितीनं त्यासाठी 15 सदस्यीय संघाती आज घोषणा केली. महत्वाची बाब म्हणजे या संघात 2007 सालच्या विश्वचषक संघातील दोन खेळाडूंचा समावेश आहे.

रोहित-कार्तिक टी20 वर्ल्ड कपमध्ये एकत्र

2007 साली धोनीच्या विश्वविजेत्या संघात रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक एकत्र खेळले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रोहित शर्मानं त्या स्पर्धेत अर्धशतकही ठोकलं होतं. तर दिनेश कार्तिकनही संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. पण त्यानंतर दिनेश कार्तिकचं संघातलं स्थान डळमळीत झालं. अनेकदा तो संघात यायचा पण धोनीमुळे त्याला अंतिम अकरात फार कमी संधी मिळाली. पण दुसरीकडे रोहितनं मात्र गिअर बदलला आणि वन डे, टी20तलं स्थान पक्क केलं. आणि आता तर रोहित आगामी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा कॅप्टन बनलाय.

रोहितनं पाळला शब्द...

दिनेश कार्तिकची क्रिकेट कारकीर्द अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. गेल्या टी20 वर्ल्ड कपला तर दिनेश कार्तिक कॉमेंटेटरच्या भूमिकेत होता. त्याचवेळी त्याच्या एका फोटोवर रोहितनं कमेंट केली होती. रोहितनं कार्तिकला म्हटलं होतं की ‘तुझ्यात अजून बरंच क्रिकेट बाकी आहे’. अखेर रोहितच्याच वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

कार्तिकनं गाजवलं आयपीएल

यंदाच्या आयपीएलमध्येही कार्तिकनं जबरदस्त कामगिरी बजावली. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं त्याला संघात घेतलं होतं. गेल्या मोसमात त्यानं आरसीबीकडून खेळताना 14 सामन्यात 284 धावा ठोकल्या होत्या. त्याचा स्ट्राईक रेटही 200 च्या जवळपास होता. यात कामगिरीमुळे टीम इंडियाच्या टी20 संघात दिनेश कार्तिकचं स्थान पक्क झालं. आणि आता तो पुन्हा एकदा वर्ल्ड कपमध्येही खेळणार आहे.

First published:

Tags: Rohit sharma, Sports, T20 world cup 2022