• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • 'We Both Didn’t Have Beard' म्हणत चहरने शेअर केला रोहितचा १५ वर्षापूर्वीचा लूक

'We Both Didn’t Have Beard' म्हणत चहरने शेअर केला रोहितचा १५ वर्षापूर्वीचा लूक

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) इन्स्टाग्रामवर रोहिसोबतचा 15 वर्षापूर्वीचा जूना फोटो शेअर केला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर: टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्धच्या (IND vs NZ) टी20 सीरिजची विजयानं सुरूवात केली आहे. त्यामुळे संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. . पूर्णवेळ टी-20 कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला विजय होता. संघ उत्साहात पाहायला मिळत आहे. अशातच भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने (Deepak Chahar) इन्स्टाग्रामवर रोहिसोबतचा 15 वर्षापूर्वीचा जूना फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो तुफन व्हायरल होत आहे. दीपक चहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये रोहित शर्मा आणि दीपक चहर दिसत आहेत. हा फोटो जयपूरच्याच स्टेडियममधला आहे. हो फोटो शेअर करताना चहरने खोडकर कॅप्शन दिली आहे.
  ”जवळपास १५ वर्षांनंतर त्याच मैदानावर आमचा फोटो. त्यावेळी मला आणि रोहित भाईला दाढी नव्हती.” असे चहरने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या पहिल्याच सामन्यात दीपक चांगलाच महागात ठरला. चहरने चार षटकांत 42 धावा देत एक बळी घेतला. या खराब गोलंदाजीनंतरही चहरला ‘अमेझिंग मोमेंट अवॉर्ड’ देण्यात आला. गप्टिलला बाद केल्यानंतर त्याच्या प्रतिक्रियेसाठी त्याला हा पुरस्कार देण्यात आला. पूर्णवेळ टी-20 कर्णधार रोहित शर्मा आणि नवीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला विजय होता.
  Published by:Dhanshri Otari
  First published: