मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'2 वर्षातून 1 हिट सिनेमा देऊन हिटमॅन नाही बनू शकत', रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली

'2 वर्षातून 1 हिट सिनेमा देऊन हिटमॅन नाही बनू शकत', रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली

रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली.

रोहित शर्माने उडवली आमिर खानची खिल्ली.

Rohit Shram's statement about Aamir Khan: आमिर खानबाबत वक्तव्य करत क्रिकेटर रोहित शर्माने त्याची खिल्ली उडवली आहे.पाहूया नेमकं काय घडलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 26 मार्च- बॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत ज्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन तर केलंच शिवाय त्यातून मोठा संदेशही दिला. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे आमिर खानचा 'थ्री इडियट्स' होय. या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. हा चित्रपट आजही लोक तितक्याच उत्सुकतेने पाहात असतात. या चित्रपटाचा सिक्वेल कधी येणार अशी विचारणाही करत असतात. दरम्यान या चित्रपटातील तिन्ही कलाकार आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवनला पुन्हा एकदा एकत्र पाहून सिनेमाची दुसऱ्या भागाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.दरम्यान आमिर खानबाबत वक्तव्य करत क्रिकेटर रोहित शर्माने त्याची खिल्ली उडवली आहे.पाहूया नेमकं काय घडलंय.

'थ्री इडियट्स' मध्ये आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवनला या तीन मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. शिक्षण, शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांवर येणारं दडपण यावर भाष्य करणारा हा सिनेमा होता. यामध्ये आमिर खानसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री करीना कपुर होती. नुकतंच आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवन पुन्हा एकदा एकत्र दिसून आल्याने चर्चेला उधाण आलं होतं. मात्र हे तिघे फक्त एका क्रिकेट ऍपच्या जाहिरातीसाठी एकत्र आले होते.

(हे वाचा: Raveena Tandon: 'ती'ला पतीच्या जवळ पाहून भडकलेली रविना टंडन; भर पार्टीत राडा घालत केलेलं जखमी)

या क्रिकेट ऍपचा एक नवा प्रोमोशनल व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये आमिर खान, शरमन जोशी आणि आर. माधवन एक पत्रकार परिषद घेताना दिसून येत आहेत. व्हिडीओमध्ये तिन्ही कलाकार क्रिकेट सोडून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणाऱ्या क्रिकेटर्सची थट्टा करताना दिसून येत आहेत. सोबतच आता आपणही क्रिकेटच्या ,मैदानात उतरणार असल्याची घोषणा करत आहेत.

या पत्रकार परिषदेवर काही क्रिकेटर्सच्या प्रतिक्रियाही दाखवण्यात आल्या आहेत. आमिर खानच्या त्या वक्तव्यावर उत्तर देत रोहित शर्मा म्हणतो, लगानमध्ये क्रिकेट खेळून कोणी क्रिकेटर नाही बनत. यावर आमिरला पाठिंबा देत आर माधवन म्हणतो, तो कसला हिटमॅन त्याच्यापेक्षा जास्त हिट चित्रपट तर याने दिलेत. यावर प्रतिक्रिया देत रोहित शर्मा पुन्हा म्हणतो, दोन वर्षातून एकदा हिट देऊन कोणी हिटमॅन नाही बनत'.

खरं सांगायचं तर ही एक क्रिकेट ऍपची जाहिरात आहे. या मजेशीर जाहिरातीत अभिनेते आणि क्रिकेटर्स एकमेकांची खिल्ली उडवताना दिसून येत आहेत. या जाहिराती रोहित शर्माशिवाय हार्दिक पांड्या, युजवेंद्र चहल,जसप्रीत बुमराह यांसारखे लोकप्रिय खेळाडूसुद्धा आहेत. ही जाहिरात सध्या प्रचंड पसंत केली जात आहे. शिवाय अभिनेते खरंच क्रिकेटच्या मैदानात उतरत धम्माल करणार का? पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Rohit sharma