रोहीत शर्मा-अजिंक्य रहाणे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी

17 फेब्रुवारी ला गेटवे येथे संध्याकाळी साडे पाच वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरीत केले जातील.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2018 10:44 PM IST

रोहीत शर्मा-अजिंक्य रहाणे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी

12 फेब्रुवारी : राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारची घोषणा करण्यात आलीये. मुंबईकर रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणेंचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.

2014-15, 2015-16 आणि 2016-17 या 3 वर्षांसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आलेत. विविध क्रीडा प्रकारातल्या एकूण 195 खेळाडूंना राज्य सरकारच्या वतीनं गौरवण्यात येईल. महत्वाच्या अशा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार साठी रमेश तावडे, अरुण दातार आणि बिभीषण पाटील यांची निवड करण्यात आलीय.

17 फेब्रुवारी ला गेटवे येथे संध्याकाळी साडे पाच वाजता राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरीत केले जातील.

शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी

क्रिकेट -रोहीत शर्मा, अजिंक्य रहाणे

Loading...

बुध्दीबळ - ग्रॅण्डमास्टर अक्षयराज कोरे, पुणे

लॉन टेनिस - प्रार्थना ठोंबरे, सोलापूर

जलतरण - मंदार दिवसे, कोल्हापूर

हॉकी - युवराज वाल्मिकी

कबड्डी - नितीन मदने, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे

वेटलिफ्टिंग - ओंकार ओतारी, गणेश माळी

अॅथलेटिक्स -ललिता बाबर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 10:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...