मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL : रोहित शर्मा गोलंदाजीतही ठरलेला 'हिट', MI विरुद्धच घेतलेली हॅट्रिक

IPL : रोहित शर्मा गोलंदाजीतही ठरलेला 'हिट', MI विरुद्धच घेतलेली हॅट्रिक

रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये एकमेव हॅटट््रिक

रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये एकमेव हॅटट््रिक

आपल्या फटकेबाजीमुळे हिटमॅन अशी ओळख असणाऱ्या रोहित शर्माने याआधी आयपीएलमध्ये अष्टपैलू म्हणून कामगिरी केली आहे.

मुंबई, 26 मे : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची फायनलच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आज क्वालिफायर 2 सामन्यात मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात विजेता संघ फायनलमध्ये चेन्नईशी लढणार आहे. आयपीएल 2023च्या विजेतेपदासाठी 28 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गत विजेत्या गुजरात टायटन्सची आतापर्यंतची घोडदौड चांगली आहे. पण मुंबई इंडियन्ससाठी यंदाचा हंगाम चढऊतारांनी भरलेला आहे. यातच रोहित शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.

हिटमॅन रोहित शर्माने 15 सामन्यात फक्त 324 धावा केल्या आहेत. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्ससाठी दिलासा देणारी बाब म्हणजे सनरायजर्स हैदाबारविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 37 चेंडूत 56 धावा करत आपण फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले. मुंबईला आगामी सामन्यात विजय मिळवायचा असेल तर रोहित शर्माच्या फलंदाजीची भूमिका महत्त्वाची ठरेल.

IPL फायनलच्या तिकिटासाठी मारामारी, एकमेकांच्या अंगावर चढले चाहते; VIDEO VIRAL 

आयपीएलच्या सुरुवातीच्या तीन हंगामात रोहित शर्मा डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. त्यानंतर 2011 मध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला. आपल्या फटकेबाजीमुळे हिटमॅन अशी ओळख असणाऱ्या रोहित शर्माने याआधी अष्टपैलू म्हणून कामगिरी केली आहे. आयपीएल 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना रोहितने 16 सामन्यात 326 धावा केल्या होत्या. याशिवाय ऑफ स्पिन गोलंदाजी करताना 11 विकेटही घेतल्या होत्या.

रोहित शर्माने 2009 च्या हंगामात डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याची गोलंदाजीतली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. त्या वर्षी डेक्कन चार्जर्सने विजेतेपद पटकावलं होतं. रोहित शर्माने सहा धावात 4 विकेट घेतल्या होत्या. त्याआधी 2008 च्या हंगामात 13 सामन्यात 404 धावा केल्या होत्या. तर एक विकेट घेतली होती. 2010 मध्येही रोहितने 404 धावा केल्या आणि दोन विकेट घेतल्या होत्या.

आयपीएल 2009 च्या हंगामात रोहित शर्माने हॅट्ट्रिक घेतली होती. विशेष म्हणजे त्याने ही कामगिरी मुंबई इंडियन्सविरुद्ध केली होती. रोहितने सेंच्युरियन मैदानावर सलग तीन चेंडूवर अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी ड्युमिनीला बाद केलं होतं. त्यावेळी लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएल सामन्यांचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत करण्यात आले होते.

First published:
top videos

    Tags: IPL 2023