मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटच्या मैदानात आणखी एक पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी

क्रिकेटच्या मैदानात आणखी एक पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी वर्णी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 8 जानेवारी :  राजकारणातील 'चाणक्य' अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणासोबतच क्रिकेट विश्वातही तितकेच  अॅक्टिव्ह दिसतात. आता आजोबांपाठोपाठ त्यांचा नातू म्हणजेच आमदार रोहित पवार यांची देखील क्रिकेटच्या मैदानात एंट्री झाली आहे.  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार क्लब गटाकडून विजयी झाले होते. त्यानंतर रोहित पवार यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीनंतर आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर असोशिएशनच्या कमिटीची बैठक पारपडली. यात रोहित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी कंबर कसली होती. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आशिष शेलार यांच्याशी पवार यांनी युती केली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनमध्ये रोहित पवारांची एंट्री झाली आहे.

हे ही वाचा : IND VS SL : टी २० नंतर आता वन-डे मालिकेतही जलवा दाखवण्यास टीम इंडिया सज्ज; पहा सामन्यांचे वेळापत्रक

रोहित पवार यांसोबतच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि क्रिकेट हा इतिहास देशातील सर्वांनाच ज्ञात आहे. अशात आता त्यांचे नातू रोहित पवार हे देखील क्रिकेटच्या मैदानात आल्याने यांची अध्यक्षपदाची कारकीर्द कशी ठरते याकडे सर्वांचे लक्ष असेल.

First published:

Tags: Cricket, Rohit pawar, Sharad Pawar