मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: वर्षभरात विराटच्या टीममधील ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट, पाहा रोहितनं कसा बदलला वर्ल्ड कपचा संघ?

T20 World Cup: वर्षभरात विराटच्या टीममधील ‘या’ खेळाडूंचा पत्ता कट, पाहा रोहितनं कसा बदलला वर्ल्ड कपचा संघ?

रोहित शर्मा, विराट कोहली

रोहित शर्मा, विराट कोहली

T20 World Cup: गेल्या वर्षी विराट कोहलीचा संघ दुबईत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधून साखळी फेरीतच गारद झाला होता. पण यंदा रोहितनं त्या संघात तब्बल सहा मोठे बदल केले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 12 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या 15 सदस्यीय संघात गेल्या वर्ल्ड कप संघाच्या तुलनेत अनेक बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी विराट कोहलीचा संघ दुबईत झालेल्या टी20 वर्ल्ड कपमधून साखळी फेरीतच गारद झाला होता. पण यंदा रोहितनं त्या संघात तब्बल सहा मोठे बदल केले आहेत.

विराटच्या संघातील कुणाला डच्चू?

गेल्या वर्षी वर्ल्ड कप संघातून वगळलेल्या दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि हर्षल पटेलला यंदा मात्र संधी मिळाली आहे. तर दीपक हुडा आणि युवा अर्शदीप सिंग हे यंदाच्या विश्वचषकातले नवे चेहरे असतील. दरम्यान विराटच्या संघातील ईशान किशन, राहुल चहर, वरुण चक्रवर्ती, शार्दूल ठाकूर आणि मोहम्मद शमीला मात्र रोहितच्या संघात जागा मिळालेली नाही. पण 2021 च्या त्या संघातील नऊ जण यंदाही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

युजवेंद्र चहलचं कमबॅक

गेल्या वर्षी बीसीसीआयच्या निवड समितीनं युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलसारख्या अनुभवी खेळाडूंना वर्ल्ड कप संघातून डावललं होतं. त्यांच्या जागी कमी अनुभव असलेल्या राहुल चहर आणि वरुण चक्रवर्तीला संघात जागा दिली होती. या निर्णयावर अनेकांनी सडकून टीका केली होती. वर्ल्ड कपदरम्यान त्याचा मोठा फटकाही विराट अँड कंपनीला बसला आणि भारतीय संघाला साखळी फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला. रोहित शर्मानं मात्र यंदा ती चूक सुधारुन युजवेंद्र चहलसह अक्षर पटेललाही संघात घेतलं आहे.

टी20 वर्ल्ड कपसाठीचा भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, रवीचंद्रन अश्विन , हर्षल पटेल, दीपक हुडादिनेश कार्तिक, अर्शदीप सिंग

स्टँड बाय खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई आणि दीपक चहर

First published:

Tags: Cricket, Rohit sharma, T20 world cup 2022, Team india, Virat kohli