मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Roger Federer: लेव्हर कप फेडररच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना?

Roger Federer: लेव्हर कप फेडररच्या कारकीर्दीतील अखेरची स्पर्धा, पाहा कधी खेळणार शेवटचा सामना?

लेव्हर कपमध्ये फेडरर खेळणार अखेरचा सामना

लेव्हर कपमध्ये फेडरर खेळणार अखेरचा सामना

Roger Federer: फेडररनं निवृत्ती जाहीर केली असली तरी तो पुढच्या आठवड्यात आपला अखेरचा सामना खेळणार आहे. लेव्हर कप स्पर्धा ही फेडररच्या कारकीर्दीतली अखेरची स्पर्धा ठरेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

मुंबई, 15 सप्टेंबररॉजर फेडररनं टेनिसमधून अचानक निवृत्ती घेतली आणि कोट्यवधी टेनिसप्रेमींना धक्का बसला. खरं तर गेले दीड वर्ष फेडरर टेनिसपासून दूर होता. दुखापती, त्यामुळे झालेल्या शस्त्रक्रियांमुळे गेल्या 10 पैकी केवळ 2 ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्येच तो खेळला. आणि आज त्यानं अचानकपणे टेनिसमधून निवृत्तीही स्वीकारली. यापुढे फेडरर ग्रँड स्लॅममध्ये खेळताना दिसणार नाही, पण या आठवड्य़ाच्या शेवटी होणारी लेव्हर कप ही फेडररच्या कारकीर्दीतली अखेरची स्पर्धा ठरेल.

लेव्हर कपमध्ये फेडररला निरोप

पुढच्या आठवड्यात लंडनमध्ये लेव्हर कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा एक टीम इव्हेंट आहे. युरोप आणि जगातल्या इतर देशातल्या अव्वल टेनिसपटूंमध्ये ही स्पर्धा रंगते. या स्पर्धेत फेडरर टीम युरोपचं प्रतिनिधित्व करतो. फेडररसह स्पेनचा राफेल नदाल आणि सर्बियाचा नोवाक ज्योकोविच हेही टीम युरोपध्ये आहेत.

लंडनमध्ये होणारा यंदाचा लेव्हर कप खास ठरणार आहे. कारण या स्पर्धेत महान टेनिसवीर रॉजर फेडरर अखेरची स्पर्धा खेळणार आहे. त्यामुळे टेनिसप्रेमींसाठी ती एक फार मोठी पर्वणी ठरावी.

कधी होणार लेव्हर कपचे सामने?

22 सप्टेंबरला लेव्हर कप स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना खेळवला जाईल. तर रविवारी 25 सप्टेंबरला स्पर्धेची अंतिम लढत होईल. लंडनच्या O2 अरेनामध्ये हे सामने खेळवण्यात येतील.

First published:

Tags: Sports, Tennis player