रोम, 03 ऑगस्ट : कोरोनाव्हायरसमध्ये (Coronavirus) जेव्हा सारं जग लॉकडाऊनमध्ये होतं तेव्हा दोन इटालियन मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये या दोन्ही मुली घराच्या छतावर टेनिस खेळताना दिसल्या. इटलीच्या लिगुरियामध्ये 13 वर्षाच्या व्हिटोरिया आणि 11 वर्षाच्या कॅरोलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या दोन्ही मुलींना चक्क टेनिस दिग्गज रॉजर फेडररने (Roger Federer) सरप्राइज दिले.
फेडररने व्हिडीओ पोस्ट करत, या दोन्ही मुलींसोबत टेनिस खेळताना दिसत आहे. या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुलींना सरप्राइज देत फेडरर त्यांच्यासोबत टेनिस खेळण्यासाठी आला. फेडररला पाहून या दोन्ही मुली खूप खूश झाल्या.
वाचा-राफेल विमान हवेतच रिफील करू शकतं इंधन? वाचा या व्हायरल VIDEO मागचं सत्य
From a rooftop match that went viral to meeting @rogerfederer.
Just incredible to see 💖pic.twitter.com/LuozuHYJiT
— ATP Tour (@atptour) July 31, 2020
वाचा-CCTV VIDEO: हम तो उड गये! हवेत उडून महिलेवर आदळला रिक्षा चालक
फेडरर या दोन्ही मुलींसोबत टेरेसवर टेनिस खेळताना दिसत आहे, ही तिच टेरेस आहे जिखे या मुलींचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. प्रोफेशनल टेनिस असोसिएशनने (ATP) हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये टेनिस खेळल्यानंतर फेडरर दोन्ही मुलींबरोबर जेवताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये मुलींसोबत टेरेसवर टेनिस खेळल्यानंतर फेडरर म्हणतो की मी जगभर टेनिस खेळलो आहे, मात्र या मुलींबरोबर टेरेसवर टेनिस खेळणं ही एक वेगळी गोष्ट आहे.
वाचा-...आणि अचानक आकाशातून खाली पडताना दिसली उल्का, अद्भुत VIDEO VIRAL
या व्हिडीओमध्ये फेडररने सांगितले की, अशा प्रकारे खेळून आम्ही जगाला सांगत आहोत की कोणत्याही वातावरणात टेनिस खेळू शकता. रॉजर फेडररने या मुलींना आणखी एक सरप्राइज देणार आहे. या मुलींना राफेल नदालच्या (Rafael Nadal) टेनिस अकादमीमध्ये प्रवेश दिला आहे.