रॉजर फेडरर इतिहास घडवणार?

हा सामना जिंकल्यास रॉजर फेडरर आठवेळा विम्बल्डन जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2017 12:00 PM IST

रॉजर फेडरर इतिहास घडवणार?

16जुलै : आज विम्बल्डनच्या फायनलमध्ये रॉजर फेडरर आणि एम. सिलीक यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यावर साऱ्या जगाचे लक्ष लागलंय कारण हा सामना जिंकल्यास रॉजर फेडरर आठवेळा विम्बल्डन जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल.

रॉजर फेडरर आतापर्यंत 18 ग्रॅन्ड स्लॅम्स जिंकला आहे, तर 29 ग्रॅन्ड स्लॅम्सच्या फायनलमध्ये तो पोचला आहे. केन रोजवेल नंतर विम्बल्डनची फायनल गाठणारा सर्वात वयस्क खेळाडूही फेडरर ठरलाय. फेडरर 11व्यांदा विम्बल्डनच्या फायनलमध्ये पोचला आहे. दरम्यान साऱ्या जगाचे लक्ष 35 वर्षांच्या फेडररवर असले तरीही या फायनलसाठी मी तयार असल्याचं एम.सिलीकचं म्हणणं आहे.

सेमी फायनलमध्ये अत्यंत रोमांचक लढतीत फेडररने टी.बेरडाईचचा 7-6(4), 7-6(4), 6-4 असा पराभव केला आणि फायनलमध्ये धडक मारली. फायनल जिंकण्यासाठी काय करणार असं विचारलं असता 'मला फोकस्ड राहावं लागणार आहे' असं फेडरर म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...