स्पोर्ट्स

  • associate partner

IPL 2020 : आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन, खेळाडूने बॉलला लाळ लावली, VIDEO VIRAL

IPL 2020 : आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन, खेळाडूने बॉलला लाळ लावली, VIDEO VIRAL

आयपीएल (IPL 2020)च्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)च्या मॅचमध्ये आयसीसी (ICC)च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

दुबई, 1 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)च्या मॅचमध्ये आयसीसी (ICC)च्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानचा खेळाडू रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) ने फिल्डिंग करत असताना बॉलला लाळ लावल्याचा व्हिडिओ व्हायरल (VIDEO VIRAL) झाला आहे. कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे क्रिकेट पुन्हा सुरु करताना आयसीसीने बॉलवर लाळ लावायला बंदी घातली होती. पण उथप्पाने मात्र आयसीसीचा हा नियम मोडल्याचं समोर येत आहे.

टॉस जिंकून राजस्थानने कोलकातल्याला पहिले बॅटिंगसाठी बोलावलं. यानंतर तिसऱ्या ओव्हरदरम्यान फिल्डिंग करत उथप्पा बॉलला लाळ लावताना दिसला. तिसऱ्याच ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटच्या बॉलिंगवर उथप्पाने कोलकात्याचा ओपनर सुनील नारायणचा सोपा कॅच सोडला. कॅच सोडल्यानंतर उथप्पाने बॉलला लाळ लावली. आयसीसीच्या नियमानुसार, असं केल्यास टीमला दोनवेळा दोनवेळा समज दिली जाते. तरीही बॉलला लाळ लावली तर, पेनल्टी म्हणून 5 रन दिल्या जातात.

राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये कोलकात्याचा 37 रनने विजय झाला. पहिले बॅटिंग करताना कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 174 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 137 रनच करता आले. राजस्थानचा या मोसमातला हा पहिलाच पराभव आहे. तर कोलकात्यानं दुसरी मॅच जिंकली आहे. वरुण चक्रवर्ती, शिवम मावी आणि कमलेश नागरकोटी या युवा बॉलरनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर सुनील नारायण, पॅट कमिन्स आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

Published by: Shreyas
First published: October 1, 2020, 3:56 PM IST

ताज्या बातम्या