कोलकाता, 04 ऑक्टोबर : भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाने मयंक अग्रवालबद्दल बोलताना सांगितलं की, जर कर्नाटकचे माजी कर्णधार आर विनय कुमार यांनी मयंकला वेळीच सल्ला दिला नसता तर आज क्रिकेटला असा फलंदाज बघायला मिळाला नसता. मयंकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतकी खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवलं आहे.
मयंक अग्रवाल जेव्हा कर्नाटककडून खेळत होता तेव्हा संघातून बाहेर पडण्याची वेळ त्याच्यावर आली होती. त्यावेळी रॉबिन उथप्पा त्याचा सहकारी खेळाडू होता. उथप्पाने सांगितलं की कशाप्रकारे मयंकला आर विनय कुमार यांनी प्रेरणा दिली आणि त्यानंतर मयंकच्या फलंदाजीत सुधारणा झाली.
उथप्पाने कोलकाता नाइट रायडर्सच्या एका कार्यक्रमावेळी सांगितलं की, मला आठवतं त्यावेळी मयंकला रणजी सामन्यातून वगळण्यावर विचार करत होतो. पण तेव्हा कर्णधार आर विनय कुमारने त्याला सल्ला दिला आणि त्यानंतर मयंकने त्रिशतक लगावलं. पुन्हा मयंकने कधीच मागे वळून पाहिलं नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिलं त्रिशतक करताना त्यानं महाराष्ट्रविरुद्ध नाबाद 304 धावांची खेळी केली होती.
भारताचा हिटमॅन रोहित शर्माचेदेखील रॉबिन उथप्पाने कौतुक केलं. कसोटीमध्ये सलामीवीर म्हणून पहिल्यांदा उतरताना दीडशतकी खेळी केली. त्याने 244 चेंडूत 176 धावा केल्या. उथप्पा म्हणाला की, रोहितनं भारत आणि भारताबाहेर चांगली कामगिरी केली आहे. कसोटीतही त्याची कामगिरी चांगली आहे. रोहित जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.
VIDEO: प्रशासनाच्या भोंगळ कारभार; कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढण्याची वेळ
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा