Home /News /sport /

...तर मीही 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाचा संताप

...तर मीही 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाचा संताप

भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तो जास्त काळ खेळेल, असं अनेकांना वाटलं होतं, पण त्याचं करियर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतं मर्यादित राहिलं.

    मुंबई, 22 मे : भारताचा क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तो जास्त काळ खेळेल, असं अनेकांना वाटलं होतं, पण त्याचं करियर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतं मर्यादित राहिलं. आपल्या छोट्या कारकिर्दीचं कारण सांगताना उथप्पाने संताप व्यक्त केला. बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे आपल्या कारकिर्दीचं नुकसान झाल्याचं उथप्पा म्हणाला. 2006 साली त्याने इंग्लंडविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर 2007 साली त्याने स्कॉटलंडविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. उथप्पाने भारताकडून 46 वनडेमध्ये 934 रन केल्या, तर 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला 249 रन करता आल्या. माझ्या करियरमध्ये मी 3 पेक्षा जास्तवेळा एका क्रमांकावर बॅटिंग केली नाही. प्रत्येक तिसऱ्या मॅचमध्ये माझा बॅटिंग क्रमांक बदलला जायचा. जर मी एकाच क्रमांकावर 49 मॅच खेळलो असतो, तर भारतासाठी 149 किंवा 249 मॅच खेळलो असतो, असं उथप्पा म्हणाला. टीमला फायदा होत असल्यामुळे मी तसं केलं, पण त्यामुळे माझं करियर खराब झालं, असं वक्तव्य उथप्पाने केलं. केरळकडून खेळणाऱ्या उथप्पाने त्याचा सहकारी एस.श्रीसंत (S Sreesanth) याचंही कौतुक केलं आहे. उथप्पाने श्रीसंतची तुलना मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि कपिल देव (Kapil Dev) यांच्यासोबत केली आहे. श्रीसंत पुनरागमनानंतर लयीमध्ये दिसत आहे. त्याचा आऊटस्विंग आणि सीम पोझिशन देशातल्या सर्वोत्तम बॉलरपैकी एक आहे. श्रीसंतची तुलना तुम्ही कपिल देव आणि मोहम्मद शमीसोबत करू शकता, अशी प्रतिक्रिया उथप्पाने दिली.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Team india

    पुढील बातम्या