मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

तीन वर्ष रॉबिन उथप्पासोबत बोलला नाही हा दिग्गज क्रिकेटपटू, जाणून घ्या कारण

तीन वर्ष रॉबिन उथप्पासोबत बोलला नाही हा दिग्गज क्रिकेटपटू, जाणून घ्या कारण

रॉबिन उथप्पाने सौरभ पंतच्या युट्यूब चॅनलवर याबाबत खुलासा केला.

रॉबिन उथप्पाने सौरभ पंतच्या युट्यूब चॅनलवर याबाबत खुलासा केला.

रॉबिन उथप्पाने सौरभ पंतच्या युट्यूब चॅनलवर याबाबत खुलासा केला.

मुंबई, 18 मे: क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू एकमेकांसोबत भिडल्याचं आपण अनेकवेळा पाहिलं आहे, पण मॅच संपल्यानंतर क्रिकेटपटू हे भांडण विसरूनही जातात, तर काहीवेळा ही नाराजी बराच काळ चालते. भारताचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) याच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे. मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) आपल्यासोबत दोन ते तीन वर्ष बोलत नव्हता, असं उथप्पा म्हणाला आहे. 2007 नंतर जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि भारत (India vs Australia) यांच्यात सामना व्हायचा, तेव्हा दोन्ही टीममध्ये भरपूर स्लेजिंग व्हायचं, असं उथप्पाने सांगितलं.

भारताने 2007 सालच्या टी-20 वर्ल्ड (T20 World Cup) कपच्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, यानंतर टी-20 सीरिज जिंकली आणि 7 मॅचची वनडे सीरिज बरोबरीत सुटली होती. रॉबिन उथप्पाने सौरभ पंतच्या युट्यूब चॅनलवर दोन्ही टीममध्ये स्लेजिंग कधी सुरू झालं, याबाबत खुलासा केला. स्लेजिंगला सुरुवात 2007 टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला झाली. ऑस्ट्रेलियन खेळाडू जेव्हा स्लेजिंग करायचे तेव्हा काही जण त्यांना प्रत्युत्तर द्यायचे, यामध्ये झहीर खान (Zaheer Khan) होता, पण कोणत्याही बॅट्समनने त्यांना उत्तर दिलं नाही, असं उथप्पाने सांगितलं.

मुंबई इंडियन्सचा महान खेळाडू T20 वर्ल्ड कप खेळणार! बोर्डाने सुरू केली चर्चा

'मी एन्ड्रयू सायमंड्स (Andrew Symonds), मिचेल जॉनसन (Mitchell Jhonson) आणि हेडनवर निशाणा साधला. हेडनला स्लेजिंग करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. कारण बॅट्समन म्हणून हेडनने मला कायमच प्रेरित केलं होतं. मी बॅटिंगला आलो तेव्हा हेडनने मला त्रास द्यायला सुरुवात केली, त्यामुळे मीही जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलं.

IPL 2021: महेंद्रसिंह धोनीनं केली जडेजाच्या तलवारबाजीची नक्कल, पाहा VIDEO

हेडन बॅटिंगला आला तेव्हा मी त्याचं खूप स्लेजिंग केलं. हा वाद इतका टोकाला गेला, की तो माझ्याशी 2-3 वर्ष बोलत नव्हता. टीम जिंकली पण हेडनने मात्र अबोला धरला,' अशी प्रतिक्रिया उथप्पाने दिली.

First published:

Tags: Cricket, India vs Australia