मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बांगलादेशाला मोठा धक्का; सैफुद्दीन T20 WorldCup मधून बाहेर, 'या' खेळाडूला मिळणार संधी

बांगलादेशाला मोठा धक्का; सैफुद्दीन T20 WorldCup मधून बाहेर, 'या' खेळाडूला मिळणार संधी

mohammad saifuddin

mohammad saifuddin

टी20 वर्ल्ड कप (T20 WorldCup )स्पर्धेत इंग्लंडसोबतच्या लढतीपूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन(Mohammad Saifuddin) जायबंदी झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

शारजाह, 27 ऑक्टोबर: टी20 वर्ल्ड कप (T20 WorldCup )स्पर्धेत 20 वा सामना इंग्लंड आणि बांगलादेश (England vs Bangladesh) यांच्यात होणार आहे. या दोघांमधील रोमांचक सामना अबुधाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर आज सायंकाळी 7.30 होणार आहे. या मोठ्या लढतीपूर्वी बांगलादेश संघाला मोठा झटका बसला आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत संघासाठी चार सामन्यांत पाच विकेट घेणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद सैफुद्दीन (Mohammad Saifuddin) जायबंदी झाल्याने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

बांगलादेशाचा स्टार वेगवान गोलंदाज अचानक बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटच्या या मोठ्या स्पर्धेत सैफुद्दीन हा आपल्या संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा चौथा गोलंदाज होता. त्याच वेळी, तो सध्या T20 वर्ल्ड कप 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत 16 व्या क्रमांकावर आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याल्या संघातून बाहेर करत त्याच्या जागी 31 वर्षीय वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनचा 15 सदस्यीय संघात समावेश केला आहे. हंगामाच्या मध्यात हुसैनला संघात संधी मिळाली आहे, त्यामुळे मिळालेल्या संधीचे सोनं करातो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सैफुद्दीन पाठदुखीच्या कारणास्तल संघातून बाहेर काढण्यात आले आहे. मोहम्मद सैफुद्दीनच्या T20 क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने या फॉरमॅटमध्ये बांगलादेशसाठी 29 सामने खेळले आहेत, 29 डावांमध्ये 26.6 च्या सरासरीने 31 विकेट्स घेतल्या आहेत. T20 क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 33 धावांत चार विकेट्स त्याने घेतल्या आहेत.

फलंदाजीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आपल्या संघासाठी क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये 29 सामने खेळताना 17 डावांमध्ये 17.8 च्या सरासरीने 196 धावा केल्या आहेत. T20 क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी नाबाद 39 आहे.

First published:

Tags: Bangladesh, England, T20 cricket, T20 league, T20 world cup