मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Legends Cricket: क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची पुन्हा संधी, पाहा कधी आणि कुठे होणार सामना?

Legends Cricket: क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची पुन्हा संधी, पाहा कधी आणि कुठे होणार सामना?

सचिन तेंडुलकर आणि जॉन्टी ऱ्होड्स

सचिन तेंडुलकर आणि जॉन्टी ऱ्होड्स

Legends Cricket: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या निमित्तानं क्रिकेटविश्व गाजवलेले अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. महत्वाची बाब ही की क्रिकेटचा देव अशी ओळख असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही या स्पर्धेत खेळणार आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

कानपूर, 10 सप्टेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव. सचिननं 90 चं दशक आणि त्यानंतरची अनेक वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्यानं विक्रमांचे अनेक इमले उभारले. त्याच्या काही विक्रमांच्या अजून जवळपासही कुणी गेलेलं नाही. 2013 साली सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नाही. पण दोन वर्षांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20च्या निमित्तानं क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिनला मैदानात पुन्हा एकदा खेळताना पाहता आलं. आणि ती संधी आता पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.

सचिन वि. जॉन्टी सामना

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या या सीझनमध्ये सचिन तेंडुलकरची इंडिया लीजंड्स आणि जॉन्टी ऱ्होड्सची दक्षिण आफ्रिका लीजंड्स टीम आमनेसामने येणार आहेत. कानपूरच्या मैदानात स्पर्धेतला हा पहिला सामना आज संध्याकाळी पार पडणार आहे. या निमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लीजंड्स संघात हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, मुनाफ पटेल, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या माजी खेळाडूंचाही समावेश आहे.

वर्ल्ड सीरीजचा दुसरा सीझन

रोड सेफ्टी वर्ल्ज सीरीजचा हा दुसरा सीझन आहे. यंदाच्या सीझनमध्ये भारतासह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. भारतातल्या चार शहरांमध्ये या आठ संघात 23 सामने खेळवले जाणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 1 ऑक्टोबरला होणार आहे.

निवृत्तीनंतर रैनाही लीजंड्स संघात

दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपाठोपाठ सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारताच्या सुरेश रैनानं नुकतीच निवृत्ती घोषित केली होती. पण निवृत्तीनंतर रैना लीजंड्सच्या संघात सामील झाला. त्यामुळे रैना सचिन आणि इतर दिग्गजांसह लीजंड्स क्रिकेट गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022

इंडिया लीजंड्स वि. दक्षिण आफ्रिका लीजंड्स

ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर

संध्याकाळी 7.30 वा.

First published:

Tags: Sachin tendulkar, Sports