मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Road Safety World Series: सचिन नव्हे तर 'या' फलंदाजानं केली तुफान फटकेबाजी, इंडिया लीजंड्सची दणक्यात सुरुवात

Road Safety World Series: सचिन नव्हे तर 'या' फलंदाजानं केली तुफान फटकेबाजी, इंडिया लीजंड्सची दणक्यात सुरुवात

स्टुअर्ट बिन्नीची नाबाद अर्धशतकी खेळी

स्टुअर्ट बिन्नीची नाबाद अर्धशतकी खेळी

Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20त इंडिया लीजंड्स संघानं दमदार सुरुवात केली आहे. स्टुअर्ट बिन्नी, सुरेश रैना आणि युसूफ पठाणच्या फटकेबाजीच्या जोरावर सचिनच्या भारतीय संघानं धावांचा डोंगर उभारला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

कानपूर, 10 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. निमित्त आहे ते रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20 स्पर्धेचं. कानपूरमध्ये या स्पर्धेतला सलामीचा सामना खेळवण्यात आला. त्यात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लीजंड्सनं स्पर्धेची दणक्यात सुरुवात केली. इंडिया लीजंड्सनं दक्षिण आफ्रिकेचा या सामन्यात 61 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 218 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 156 धावाच करु शकला. कर्णधार जॉन्टी ऱ्होड्सनं सर्वाधिक 378 धावा केल्या.

स्टुअर्ट बिन्नीची फटकेबाजी

त्याआधी इंडिया लीजंड्सनं 4 बाद 217 धावांचा डोंगर उभारला.  भारतीय डावात चमकला तो अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नी. बिन्नीनं या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि नमन ओझानं डावाची सुरुवात केली. पण सचिन 16 तर ओझा 21 धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर सुरेश रैना आणि स्टुअर्ट बिन्नीनं भारतीय डावाला आकार दिला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकन गोलंदाजी फोडून काढली. बिन्नीनं आपल्या 42 धावांच्या खेळीत तब्बल 5 चौकार आणि 6 षटकार ठोकत नाबाद 82 धावा फटकावल्या. तर सुरेश रैना 22 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या युसूफ पठाणणही अवघ्या 15 चेंडूत नाबाद 35 धावा कुटल्या.

दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई

दक्षिण आफ्रिकेचा गार्नेट क्रूगर सर्वात महागडा गोलंदाज ठरला. क्रूगरनं 4 ओव्हरमध्ये तब्बल 53 धावा मोजल्या. त्यापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज मखाया एनटीनीनंही 4 ओव्हरमध्ये 52 धावा दिल्या.

First published:

Tags: Sachin tendulkar, Sports