मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

रियान परागचं नशीब पलटणार! विराटने स्पेशल मेसेज लिहून दिलं खास गिफ्ट

रियान परागचं नशीब पलटणार! विराटने स्पेशल मेसेज लिहून दिलं खास गिफ्ट

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) याने आयपीएलच्या (IPL)  गेल्या काही मोसमांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 6 जून : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा खेळाडू रियान पराग (Riyan Parag) याने आयपीएलच्या (IPL)  गेल्या काही मोसमांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. शांत राहून मैदानात आव्हानाचा पाठलाग करणं असो किंवा बिहू डान्स करणं असो, रियान पराग आयपीएलदरम्यान कायमच चर्चेत असतो. परागने राजस्थानकडून 26 सामन्यांमध्ये 126.07 च्या स्ट्राईक रेटने 324 रन केले. अनेक युवा खेळाडूंप्रमाणे रियान परागही विराटला आपला आयडल मानतो. अनेकवेळा त्याने विराटबद्दलची आपली भावनाही व्यक्त केली आहे. आयपीएलदरम्यानही रियान परागला विराटने साथ दिली. विराट कोहलीने रियान परागला आपली सही असलेली एक बॅट गिफ्ट दिली. 19 वर्षांच्या रियान परागने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. एका चाहत्याने परागला विचारलं, तुझ्या आवडत्या सेलिब्रिटीची ऑटोग्राफ कोणती आहे? यानंतर त्याने लगेच विराटची सही असलेल्या बॅटचा फोटो शेयर केला. या फोटोमध्ये विराटने एक मेसेजही लिहिला होता. प्रिय रियान खेळाची मजा घे, खूप शुभेच्छा, असं विराटने या बॅटवर लिहिलं होतं. आयपीएल 2021 मध्ये रियान परागला खास कामगिरी करता आली नाही. 6 इनिंगमध्ये त्याने 19.50 च्या सरासरीने फक्त 78 न केले. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे 4 मे रोजी 29 सामने झाल्यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आली. यानंतर आता उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. या उरलेल्या सामन्यात आपली कामगिरी उंचवण्याचं आव्हान रियान परागपुढे असेल.
First published:

Tags: Cricket news, Ipl, Virat kohli

पुढील बातम्या