ऋतु फोगटने इतकं चोपलं... इतकं चोपलं की रेफरींनाच मधे पडावं लागलं, पाहा VIDEO

ऋतु फोगटने इतकं चोपलं... इतकं चोपलं की रेफरींनाच मधे पडावं लागलं, पाहा VIDEO

भारताची कुस्तीपटू ऋतु फोगटने मिक्स्ड मार्शल आर्टमध्ये पहिल्याच लढतीत विजय मिळवला. यामध्ये प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला तिनं एकही संधी दिली नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : भारतीय कुस्तीपट्टू रुतु फोगाट हिने शनिवारी मिक्स्ड मार्शल आर्टमध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. दक्षिण कोरियाची प्रतिस्पर्धी पैलवान नेम ही किम हिला पराभूत करून ऋतु फोगाटने पदार्पणातच विजय साजरा केला. ऋतुने लढतीच्या सुरुवातीच्या काही सेकंदातच आघाडी घेतली. त्यानंतर ऋतुने किमवर मजबूत पकड मिळवली.

ऋतुने किमला मॅटवर पाडून लागोपाठ ठोसे मारले. तेव्हा रेफरींनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ऋतुने ठोसे मारणं सुरुच ठेवल. शेवटी मॅच रेफरींना हस्तक्षेप करून लढत थांबवावी लागली.

ऋतु फोगटच्या या विजयानंतर तिची मोठी बहिण आणि दिल्ली राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू गीता फोगटने ट्विटरवर अभिनंदन केलं. गीताने म्हटलं की, मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये पहिल्या विजयासह सुरुवात करणाऱ्या ऋतुचे खुप खुप अभिनंदन. ऋतुने 2017 मध्ये पोलंड इथं 48 किलोग्रॅम वजनी गटात अंडर 23 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.

विजय मिळवल्यानंतर ऋतुने म्हटलं की, मी माझ्या बहिणींचं आणि कुटुंबीयांचं आभार मानते. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला प्रेरणा दिली. आता माझं एकच लक्ष्य आहे आणि ते म्हणजे देशासाठी वन एटमवेट वर्ल्ड चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावणं.

डिलिव्हरीनंतरही HOT दिसतेय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, पाहा लेटेस्ट PHOTO

Published by: Suraj Yadav
First published: November 17, 2019, 12:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading