बेन स्टोक्सची झुंझार शतकी खेळी, गुजरात'लाॅयन्स'च्या जबड्यातून खेचला विजय

बेन स्टोक्सच्या तडाखेबाज शतकी खेळीच्या जोरावर पुणे सुपरजायंटने गुजरात लायन्सच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 2, 2017 12:03 AM IST

बेन स्टोक्सची झुंझार शतकी खेळी, गुजरात'लाॅयन्स'च्या जबड्यातून खेचला विजय

02 मे : बेन स्टोक्सच्या तडाखेबाज शतकी खेळीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटने गुजरात लायन्सच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला. रोमहर्षक सामन्यानत पुण्याने गुजरातचा 5 विकेट राखून पराभव केला.

आयपीएल 10 मध्ये सर्वात महागडा खेळाडू बेन स्टोक्सने आपला भाव इतका का आहे हे त्याने आज दाखवून दिलं. बेन स्टोक्सने 63 बाॅल्समध्ये 7 चौकार 6 सिक्स लगावत 103 रन्स ठोकले. तर पुण्यापुढे टार्गेट होतं 162 धावाचं. बेन स्टोक्सच्या शतकी खेळीवर पुण्याने हा शानदा विजय मिळवला. तर दुसरीकडे महेंद्र सिंग धोणीने 26 रन्स तर क्रिश्चनने नाबाद 17 रन्सची खेळी केली. या तिन्ही खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडून दुहेरी आकडा गाठला नाही.

162 रन्स टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली पुणे टीम 42 रन्सवर 4 विकेट अशी अवस्था झाली होती. ओपनर अजिंक्य रहाणे 4, कॅप्टन स्टीवन स्मिथ 4 रन्सवर आऊट झाले. तर मनोज तिवारी भोपळाही फोडू शकला नाही. त्यानंतर धोणी आणि स्टोक्सच्या जोडीने कमाल दाखवली. मात्र, धोणी 26 रन्स करून आऊट झाला आणि पुण्याचा पराभव निश्चित वाटू लागला. पण क्रिश्चन आणि बेन स्टोक्सने तुफान फटकेबाजी करत 3.4 ओव्हरर्समध्ये 49 रन्स करून टीमला विजय मिळवून दिला. बेन स्टोक्सने आयपीएल करिअरमधली पहिली सेंचुरी झळकावली. तर आयपीएलच्या सीझनमधली होती चौथी सेंच्युरी ठरली. त्याआधी हाशिम अमला, संजू सॅमसन आणि डेव्हिड वाॅर्नेर यांनी शतक झळकावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2017 12:02 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...