06 एप्रिल : आयपीएलच्या दहाव्या हंगामात पहिल्याच लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट मुंबई इंडियन्सवर भारी ठरलीये. अटीतटीच्या लढतीत पुणे सुपरजायंटने मुंबईला 7 विकेटसने हरवत विजयी सलामी दिलीये.
मुंबई इंडियन्सने पहिले बॅटिंग करत 184 रन्सचा टप्पा गाठला. विजयासाठी पुणे सुपरजायंटपुढे 185 रन्सचं टार्गेट ठेवलं. अखेरच्या ओव्हरर्समध्ये हार्दिक पांड्याने सिक्सर लगावत मॅचचा चेहराच बदला. पांड्याने 15 बाॅलमध्ये चार सिक्स आणि एक चौकार लगावला. मुंबईकडून सर्वाधिक सर्वाधिक जोस बटलरने 38 रन्स केले तर नितीश राणा 34 आणि पोलार्डने 27 रन्स केले.
185 रन्सचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या पुणे सुपरजायंटला 5.3 ओव्हरमध्ये मयंक अग्रवालच्या रुपाने झटका बसला. 6 रन्सवर मयंक आऊट झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि स्टीवन स्मिथने स्कोअर कार्ड हलता ठेवला. रहाणे 34 बाॅलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकार लगावत 60 रन्स केले. रहाणे आऊट झाल्यानंतर बेन स्टोक्स 21 रन्स आणि धोनीने नाबाद 12 रन्स कर टीमला अखेरच्या ओव्हरसमध्ये विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Steven smith