Home /News /sport /

IPL 2021 : ऋषभ पंतचे हे दोन फोटो दाखवतायत त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास

IPL 2021 : ऋषभ पंतचे हे दोन फोटो दाखवतायत त्याचा आत्तापर्यंतचा प्रवास

IPL 2021 भारताचा विकेटकीपर, बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कामगिरीचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. त्याची बॅटिंग चांगली आहेच पण त्यानी विकेट कीपिंगमध्येही बरीच सुधारणा केली आहे आणि त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरतोय. याचं उदाहरण नुकतंच बघायला मिळालं.

पुढे वाचा ...
मुंबई, 14 एप्रिल : भारताचा विकेटकीपर, बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कामगिरीचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. त्याची बॅटिंग चांगली आहेच पण त्यानी विकेट कीपिंगमध्येही बरीच सुधारणा केली आहे आणि त्याचा खेळ दिवसेंदिवस बहरतोय. याचं उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. आयपीएलच्या (IPL 2021) पहिल्याच सामन्यात टीमचं नेतृत्व करत असताना ऋषभ पंतने दिल्लीला (Delhi Capitals) विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने तो आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व पंतकडे देण्यात आलं. ही नवी जबाबदारी सांभाळताना पहिल्याच मॅचमध्ये त्याची परीक्षा होती कारण ही मॅच होती महान कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK). या सामन्यात दिल्लीने पंतच्या नेतृत्वाखाली चेन्नईवर 7 विकेट आणि 8 बॉल राखून मात केली. चेन्नईने दिलेलं 189 रन्सचं लक्ष्य दिल्लीचे ओपनर पृथ्वी शॉ (38 बॉलमध्ये 72 रन्स) आणि शिखर धवन (54 बॉलमध्ये 85 रन्स) यांनी 138 रन्सची पार्टनरशीप करत सहज पार करून दिलं. या दोघांनी विजयाजवळ आणून उभं केल्यानंतर शेवटी ऋषभने 15 रन करत संघाला विजय मिळवून दिला. टीमच्या या कामगिरीमुळे पंतच्या कॅप्टन्सीचं खूप कौतुक झालं. त्यानंतर सोशल मीडियावरही ऋषभ पंतचे फोटो व्हायरल झाले. ऋषभने कुठपासून कुठपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे आणि तो मेहनतीने कसा यशस्वी झाला आहे, हे दाखवणारे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. चेन्नईविरुद्धचा सामना संपल्यावर ऋषभच्या कामगिरीचं कौतुक करण्यासाठी प्रतिस्पर्धी चेन्नईच्या खेळाडूंनी त्याला एस्कॉर्ट केलं आणि रवींद्र जडेजाने बॅट उंचावून जणू त्याचा खेळाला, कॅप्टन्सीला सलामीच दिली. नेटिझन्सनी शोधलेला फोटा काही वर्षांपूर्वी चेन्नई मोबाईलमध्ये ग्रुप सेल्फी काढतानाचा आहे. यात सर्वांत मागच्या रांगेत उभा असलेला ऋषभ आपण फोटोत दिसावं म्हणून या अनुभवी खेळाडूंसोबत उभं राहण्याच्या प्रयत्न करतोय असं दिसतंय. ऋषभच्या चाहत्यांनी हे दोन्ही फोटो एकत्र ट्विट करून ऋषभ कुठे होता आणि आज त्याला सलामी दिली जातेय, असं सांगितलं आहे. त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्यात त्यात एक म्हणतो, ‘ऋषभ पंतच्या कॅप्टनसीच्या कारकीर्दीची ही उत्तम सुरूवात आहे.’ एक चाहती म्हणते, ‘ऋषभ पँथर.’ आणखी एकाने म्हटलंय, ‘ काळाबद्दल एक गोष्ट चांगली आहे की तो बदलत राहतो.’ अनेकांनी चेन्नईचे खेळाडू ऋषभला एस्कॉर्ट करतानाचा फोटो हा ‘फोटो ऑफ द डे’ असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान मॅचनंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनुभवी शिखर धवन म्हणाला, ‘ऋषभने टॉस जिंकला हे सगळ्यात चांगलं झालं. विकेट थोडीशी वेगळी होती त्यामुळे दुसऱ्यांदा बॅटिंग करणं आमच्या हिताचं ठरलं. ऋषभ स्वत: शांत राहिला आणि खेळाडूंना प्रेरणा देत होता. कॅप्टन म्हणून त्याची ही पहिलीच मॅच होती तरीही त्याने केलेले बदल खूप चांगले होते त्यामुळे तो हळूहळू आणखी सुधारेल. ऋषभची सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्याचं डोकं शांत असतं आणि समयसूचकता. जे तरुण खेळाडू मला सल्ला किंवा बॅटिंग टिप्स मागायला येतात त्या सगळ्यांना मी देतो. त्यामुळे ऋषभलाही देईन.’
First published:

Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, Rishabh pant

पुढील बातम्या