मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'हा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार', गावसकरांची भविष्यवाणी

'हा खेळाडू होईल टीम इंडियाचा कर्णधार', गावसकरांची भविष्यवाणी

भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या (Team India) भवितव्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) भविष्यात भारताचा कर्णधार होईल, असं गावसकर म्हणाले आहेत.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 मे : भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाच्या (Team India) भवितव्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) भविष्यात भारताचा कर्णधार होईल, असं गावसकर म्हणाले आहेत. ज्यापद्धतीने पंतने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सचं (Delhi Capitals) नेतृत्व सांभाळलं, ते कौतुकास्पद असल्याचं गावसकर म्हणाले. 23 वर्षांच्या ऋषभ पंतकडे भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनण्याची गुणवत्ता आहे, असं गावसकरांना वाटतं.

श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) दुखापत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने टीमचं नेतृत्व ऋषभ पंतकडे दिलं. आयपीएल स्थगित झाली तेव्हा दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर होती. दिल्लीने 8 पैकी 6 मॅचमध्ये विजय मिळवला. आणखी दोन विजयांसह दिल्ली प्ले-ऑफमध्येही पोहोचली असती.

सुनिल गावसकर यांनी स्पोर्ट्सस्टारमध्ये लिहिलेल्या लेखात पंतचं कौतुक केलं. 'आयपीएलच्या या मोसमात पंतमध्ये स्पार्क दिसला. पंतच्या नेतृत्वात दिल्लीची कामगिरीही उत्तम झाली. तो चूक करेल, प्रत्येक कर्णधार ती करतो, पण त्याच्या शिकण्याची इच्छा आहे. तो नैसर्गिकरित्या स्मार्ट असल्यामुळे त्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली. दिल्लीला त्याने कठीण परिस्थितीमधून बाहेरही काढलं. तो भविष्यासाठी आहे, यात कोणतीही शंका नाही,' असं गावसकर त्यांच्या लेखात म्हणाले. ऋषभ पंतमध्ये मला ठिणगी दिसली, या ठिणगीचं कधीही आगीत रुपांतर होऊ शकतं, असं वक्तव्य गावसकरांनी केलं.

ऋषभ पंतने आयपीएल 2021 मध्ये 8 सामने खेळून 35 पेक्षा जास्तच्या सरासरीने 213 रन केले. त्याचा स्ट्राईक रेटही 131.48 एवढा होता. ही नवी भूमिका मी एन्जॉय करत असल्याचं ऋषभ पंतने सांगितलं.

First published:

Tags: Cricket, IPL 2021, Rishabh pant, Sunil gavaskar, Team india