Home /News /sport /

विराट-पंतने दाखवला नाही विश्वास, मुंबईच्या खेळाडूने आता दाखवलं टॅलेंट!

विराट-पंतने दाखवला नाही विश्वास, मुंबईच्या खेळाडूने आता दाखवलं टॅलेंट!

आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली, तर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांनी टीममध्ये कमबॅक केलं, पण असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना टॅलेंट असूनही खेळण्याची संधी मिळाली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 7 जून : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड झाली, तर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्या यांनी टीममध्ये कमबॅक केलं, पण असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना टॅलेंट असूनही खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सचा सरफराज खानही (Sarfaraz Khan) त्यातलाच एक. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) सरफराजला फारशी संधी दिली नाही, पण याचा पस्तावा आता पंतला होत असेल. कारण सरफराज खानने मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) खेळताना धमाका केला आहे. उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनलमध्ये सरफराजने शतकी खेळी केली. 153 रनची खेळी करून सरफराज आऊट झाला. आपल्या या शतकीय खेळीमध्ये त्याने 205 बॉलचा सामना करत 14 फोर आणि 4 सिक्स लगावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे त्याचं सातवं शतक होतं. मागच्या 5 इनिंगमध्ये त्याने 156 च्या सरासरीने 624 रन केल्या आहेत. सरफराजचा विक्रम प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्या सातही शतकांमध्ये 150 रन करणारा सरफराज पहिलाच खेळाडू ठरला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये सरफराजने मागच्या 13 इनिंगमध्ये 6 शतकं केली आहेत. यामध्ये एक त्रिशतक, 3 डबल सेंच्युरी, 5 वेळा 150 पेक्षा जास्तचा स्कोअर आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी ट्रॉफी 2022 मध्ये सरफराजने आतापर्यंत 275, 63, 48, 165 आणि 153 रन केले आहेत. डॉन ब्रॅडमननंतर दुसरा खेळाडू सरफराज खानच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण झाल्या आहेत. त्याने या रन 80 पेक्षा जास्तच्या सरासरीने केल्या आहेत. 2 हजार रन करताना ब्रॅडमननंतर (Sir Don Bradman) सरफराजची सरासरी सर्वोत्तम आहे. विजय मर्चंट यांनी 71.64 च्या सरासरीने, जॉर्ज हेडली यांनी 69.86 च्या सरासरीने आणि बहिर शाह यांनी 69.02 च्या सरासरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या होत्या. आयपीएलमध्ये फक्त 6 मॅच आयपीएल 2022 च्या मोसमात दिल्लीने सरफराजला फक्त 6 मॅचमध्ये खेळवलं, यात त्याने 30.33 ची सरासरी आणि 135.82 च्या स्ट्राईक रेटने 91 रन केले. नाबाद 36 रन हा त्याचा सर्वाधिक स्कोअर होता. आरसीबीनेही डावललं विराट कोहली कर्णधार असताना आरसीबीने सरफराज खानला रिटेन केलं होतं, पण विराटनेही त्याला खेळण्याची फार संधी दिलीच नाही. पण आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धमाका करून सरफराजने बॅटनेच सगळ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या