Home /News /sport /

पंतच्या बहिणीचा खतरनाक स्टंट, वाघाच्या पिंजऱ्यात घुसली आणि...

पंतच्या बहिणीचा खतरनाक स्टंट, वाघाच्या पिंजऱ्यात घुसली आणि...

भारताचा क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या बहिणीचा वाघाच्या पिंजऱ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  नवी दिल्ली, 01 मार्च : भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पंतला टी20 आणि एकदिवसीय मालिकेत संधी मिळाली नसली तरी कसोटीत त्यानं पुनरागमन केलं आहे. तर त्याची बहीण साक्षी सध्या सुट्टी साजरी करत आहे. सध्या थायलंडमध्ये असलेल्या साक्षीचे फोटो व्हायरल होत आहे. यात ती एक धोकादायक असा स्टंट करताना दिसते.साक्षीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती वाघाच्या पिंजऱ्यात असलेली दिसते. चक्का जमिनीवर बसलेल्या वाघाच्या पाठिवर साक्षी झोपली आहे. वाघासोबत असा फोटो काढणं मोठं जोखमीचं आहे. थायलंडमधील टायगर टेंपलमधील हा फोटो असण्याची शक्यता आहे. म्यानमार आणि थायलंड यांच्यामध्ये असलेल्या टेम्पलला Wat Pa Luang Ta Bua या नावानेही ओळखलं जातं. 1994 पर्यंत ते फक्त एक बौद्ध मंदिर होतं पण 1999 मध्ये या ठिकाणी वाघाच्या बछड्याला आणण्यात आलं. त्यानंतर गावातील लोक इथं वाघाच्या बछड्याला मंदिरात आणून सोडू लागले. तेव्हापासून हे वाघांचं घर बनलं. सर्व वाघांना बौद्ध भिक्षु प्रशिक्षणही देतात. टायगर टेम्पलमध्ये परदेशी पर्यटक वाघांची भेट घेतात आणि फोटोही काढून घेत असतात. टायगर टेम्पलशिवाय साक्षीने बँकॉक आणि फुकेट बीचवरही एन्जॉय केला. तिने अनेक फोटो शेअर केले आहेत. कराबीमध्ये एका वॉटरबोटमध्ये समुद्र सफर करताना ती दिसते.
  View this post on Instagram

  Thailand trip🏖😍 Phuket~krabi~Bangkok ❤️

  A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant) on

  साक्षी पंतला बास्केटबॉल हा खेळ आवडतो. उत्तराखंड मध्ये राहणाऱी साक्षीने एमबीए पूर्ण केलं आहे. फिरण्याचा छंद असलेली साक्षी सोशल मीडियावर सक्रिय आहे. फिटनेसबाबतही ती जागरूक असल्याचं तिच्या सोशल मीडियावरूल फोटोंवरून दिसतं. हे वाचा : क्रिकेटचं किट खरेदीसाठी नव्हते पैसे, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या मुलीचे वडील विकतात दूध
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket

  पुढील बातम्या