S M L

ऋषभ पंत वनडेतही चमकणार, वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची घोषणा

महेंद्रसिंग धोनीची निवड होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होतं. मात्र निवड समितीने धोनीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्याचा संघामध्ये समावेश केला आहे.

Updated On: Oct 11, 2018 07:12 PM IST

ऋषभ पंत वनडेतही चमकणार, वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाची घोषणा

मुंबई (11 ऑक्टोबर) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी अपेक्षेप्रमाणे आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला संघात स्थान देण्यात आलं आहे. ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत दमदार कामगिरी केली. यामुळेच त्याला आता वनडेमध्येही संधी देण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनीची निवड होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होतं. मात्र निवड समितीने धोनीवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्याचा संघामध्ये समावेश केला आहे. विकेटकीपर म्हणून धोनीची कामगिरी दिवसेंदिवस चांगलीच होत असली तरीही फलंदाजीत मोठ्या धावा करण्यात तो अपयशी ठरत आहे.

पांडेचं पुनरागमन, जडेजावर विश्वासकाही काळापासून भारतीय संघातून दूर राहिलेला मधल्या फळीतील फलंदाज मनीष पांडेचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे. तर दुसरीकडे, वनडे संघातून बाहेर फेकल्या गेलेल्या रवींद्र जडेजाने आशिया चषकात लक्षवेधी कामगिरी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याच्यावर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवत त्याची निवड केली आहे.

बुमराह, भुवनेश्वरला पुन्हा विश्रांती

जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या भारताच्या जलदगती गोलंदाजीतील जोडगोळीला पुन्हा एकदा विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवख्या शार्दुल ठाकूर आणि खलील अहमदची निवड करण्यात आली आहे.

Loading...
Loading...

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर, केएल राहुल.

VIDEO : 76 वर्षांच्या अमिताभच्या फिटनेसचं हे आहे सिक्रेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 06:58 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close